स्वस्त आणि बजेट स्मार्टफोन बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या टेक ब्रँड Itel ने आज भारतात आपला नवा स्मार्टफोन सादर केला आहे. होय, गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला Itel Zeno 10 स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे. हा फोन कंपनीने अगदी प्रत्येकाच्या बजेटमध्ये येईल, अशा नाममात्र किमतीत सादर केला आहे. कमी किमतीत या फोनमध्ये तुम्हाला अनेक पॉवरफुल फीचर्स मिळणार आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात Itel Zeno 10 स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-
Also Read: 2025 च्या पहिल्या Flipkart सेलची तारीख जाहीर! स्मार्टफोन्स, लॅपटॉप्स इ. वर मिळेल भारी Discount
नवीनतम Itel Zeno 10 भारतात दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या मोबाईलच्या बेस मॉडेलमध्ये 3GB रॅमसह 64GB स्टोरेजची फक्त 5,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. तर, स्मार्टफोनचा टॉप व्हेरिएंट 4GB रॅमसह 64GB स्टोरेजची किंमत 6,499 रुपये इतकी आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, itel Zeno 10 ची विक्री Amazon या शॉपिंग साइटवर सुरू झाली आहे.
हा फोन ओपल पर्पल आणि फॅंटम क्रिस्टल कलर ऑप्शन्ससह खरेदी करता येईल. सुरुवातीच्या सेलमध्ये या फोनवर बँक ऑफर देखील दिली जात आहे. बेस मॉडेलवर 300 रुपयांची सूट आणि टॉप मॉडेलवर 500 रुपयांची सवलत मिळेल. येथून खरेदी करा.
itel Zeno 10 स्मार्टफोन 6.66-इंच लांबीच्या HD+ डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे, जो 60Hz रिफ्रेश रेटसह येतो. ही एक वॉटरड्रॉप नॉच स्टाइल स्क्रीन आहे, जी IPS पॅनेलवर बनवली आहे. विशेष म्हणजे या स्क्रीनवर डायनॅमिक बार फीचर आहे, ज्यामध्ये नोटिफिकेशन्स इ. दिसतील. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये Unisoc T603 ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 3GB रॅम+ 5GB व्हर्च्युअल रॅम मिळेल. तर, फोनच्या 4GB रॅम व्हेरिएंटमध्ये 8GB जीबी व्हर्च्युअल रॅम मिळेल.
याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी Itel Zeno 10 ड्युअल रियर कॅमेराला सपोर्ट करते. त्याच्या बॅक पॅनलवर, LED फ्लॅशसह सुसज्ज 8MP चा मुख्य सेन्सर आहे, जो सेकंडरी AI लेन्ससह कार्य करतो. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, या स्वस्त मोबाईलमध्ये 5MP चा फ्रंट कॅमेरा मिळेल. पॉवर बॅकअपसाठी, हा फोन 5000 mAh क्षमतेच्या बॅटरीसह सुसज्ज आहे. या मोबाईलमध्ये 10W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान आणि USB टाइप-C पोर्ट आहे.