50MP मेन कॅमेरासह Itel चा नवा बजेट स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत 7000 रुपयांपेक्षा कमी

Updated on 07-Jan-2025
HIGHLIGHTS

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Itel ने नवा Itel A80 स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे.

Itel A80 स्मार्टफोन 7000 रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच

वॉटर प्रोटेक्शनसाठी फोनला IP54 रेटिंग देण्यात आली आहे.

बजेट स्मार्टफोन देण्यासाठी प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Itel ने नवा Itel A80 स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा कंपनीचा नवीन बजेट स्मार्टफोन आहे, जो 7000 रुपयांपेक्षा कमी किमतीत सादर करण्यात आला आहे. कमी किमतीत या स्मार्टफोनमध्ये अनेक पॉवरफुल फीचर्स मिळतील. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा मिळेल. जाणून घेऊयात Itel A80 ची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स-

Also Read: Samsung Galaxy Unpacked 2025: वर्षातील पहिल्या मोठ्या इव्हेंटची तारीख जाहीर! ‘या’ दिवशी लाँच होणार Galaxy S25 सिरीज?

Itel A80 ची भारतीय किंमत

Itel कंपनीने Itel A80 स्मार्टफोनचा 4GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 6,999 रुपये किमतीत लाँच करण्यात आला आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा स्मार्टफोन ऑफलाइन स्टोअरमधून खरेदी करता येईल. यासह, कंपनीने 100 दिवसांपर्यंत मोफत स्क्रीन बदलण्याची सुविधा दिली आहे. या फोनमध्ये ग्लेशियर व्हाइट, सँडस्टोन ब्लॅक आणि वेव्ह ब्लू असे तीन कलर ऑप्शन्स उपलब्ध आहे.

Itel A80 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

नवीनतम Itel A80 फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर Unisoc T603 प्रोसेसरने सुसज्ज करण्यात आला आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येतो. हा फोन Android 14 Go एडिशनवर काम करतो. वॉटर प्रोटेक्शनसाठी फोनला IP54 रेटिंग देण्यात आली आहे.

याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा मिळणार आहे. तर, आकर्ष सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. फोनच्या समोर डायनॅमिक बार देण्यात आला आहे. ज्यामध्ये बॅटरी स्टेटस आणि इतर माहिती दिसेल. पॉवर बॅकअपसाठी, या फोनची बॅटरी 5000mAh आहे, ज्यामध्ये 10W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. फोनमध्ये चार्जिंगसाठी USB Type-C पोर्ट आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :