Its Here! 6000mAh मोठ्या बॅटरीसह बहुप्रतीक्षित iQOO Z9X 5G फोन भारतात अखेर लाँच, जाणून घ्या किंमत। Tech News

Updated on 16-May-2024
HIGHLIGHTS

iQOO Z9X 5G स्मार्टफोन अखेर भारतीय बाजारात लाँच

iQOO Z9x 5G स्मार्टफोन तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे.

iQOO Z9x 5G च्या सर्व व्हेरिएंटवर 1000 रुपयांची सूट उपलब्ध

मागील काही दिवसांपासून IQOO च्या iQOO Z9X 5G स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची चर्चा सुरु होती. अखेर हा स्मार्टफोन आज 16 मे 2024 रोजी लाँच भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे. या विभागातील हा सर्वात वेगवान फोन आहे, असे कंपनीने सांगितले आहे. हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह येईल. या स्मार्टफोनमध्ये दिलेली बॅटरी एका चार्जवर 2 दिवस टिकण्याची क्षमता ठेवते. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात iQOO Z9X 5G फोनची किंमत आणि सर्व तपशील-

हे सुद्धा वाचा: Powerful फीचर्ससह Motorola Edge 50 Fusion 5G फोन अखेर भारतीय बाजारपेठेत लाँच, तुमच्या बजेटमध्ये आहे का किंमत? Tech News

iQOO Z9x 5G ची भारतीय किंमत

iQOO Z9x 5G स्मार्टफोन तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. फोनच्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे. 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किमत 14,499 रुपये इतकी आहे. तर, अखेर फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येणाऱ्या टॉप व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे.

उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Amazon आणि iQOO च्या अधिकृत वेबसाइटवर 21 मे 2024 रोजी दुपारी 12 वाजतापासून सुरु होईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, सर्व व्हेरिएंटवर 1000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. ही ऑफर ICICI आणि SBI बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यावर उपलब्ध असेल. तसेच, 6GB RAM आणि 8GB RAM सह व्हेरिएंटवर 500 रुपयांची अतिरिक्त कूपन ऑफर देखील मिळेल.

iQOO Z9x 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

iQOO Z9x 5G स्मार्टफोनमध्ये 6.72 इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 120Hz आहे. चांगल्या परफॉर्मन्ससाठी हा स्मार्टफोन Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसरसह येतो. हा हँडसेट Android 14 वर आधारित Funtouch OS 14 वर चालतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, फोनची स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येईल. एवढेच नाही तर, हा फोन त्याच्या सेगमेंटमधील सर्वात स्लिम फोन आहे.

iQoo Z9x 5G Features

फोटोग्राफीसाठी, iQOO च्या या 5G फोनमध्ये 50MP मुख्य AI कॅमेरा आहे. तर, त्याच्या मागील बाजूस 2MP डेप्थ लेन्स देण्यात आली आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोर 8MP कॅमेरा मिळेल. हा डिव्हाइस 44W फ्लॅशचार्ज सपोर्टसह येतो, ज्यामध्ये 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, या फोनला धूळ आणि पाण्यापासून वाचवण्यासाठी त्याला IP64 रेटिंग देण्यात आली आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :