iQOO Z9x 5G स्मार्टफोनची पहिली सेल आज भारतात होणार सुरु, Best ऑफर्ससह खरेदी करण्याची संधी। Tech News
लेटेस्ट iQOO Z9x 5G फोनची विक्री आजपासून भारतात सुरु
iQOO Z9x 5G फोन त्याच्या सेगमेंटमधील सर्वात स्लिम फोन आहे.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP मुख्य AI कॅमेरा देण्यात आला आहे.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQOO चा iQOO Z9x 5G फोन नुकताच भारतीय बाजारात लाँच झाला आहे. त्यांनतर, iQOO च्या या 5G फोनची पहिली विक्री आज म्हणजेच 21 मे पासून सुरू होणार आहे. iQOO Z9x 5G ची पहिली सेल आज दुपारी 12 वाजतापासून सुरू होणार आहे. हा स्मार्टफोन लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वरून खरेदी करता येईल. पहिल्या सेलदरम्यान, सवलतीच्या ऑफरसह हँडसेट खरेदी केला जाऊ शकतो. कंपनीने हा फोन दमदार फीचर्ससह बजेट रेंजमध्ये सादर केला आहे. जाणून घ्या किंमत, ऑफर्स आणि स्पेसिफिकेशन्स-
हे सुद्धा वाचा: Samsung च्या लेटेस्ट Flip फोनवर मिळवा तब्बल 14,000 रुपयांचा बंपर Discount, अशी संधी पुन्हा मिळणार नाही। Tech News
iQOO Z9x 5G ची पहिली सेल
iQOO Z9x 5G हा फोन बजेट रेंजमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनच्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 12,999 रुपये इतकी आहे. तर, 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 14,499 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. त्याबरोबरच, 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या फोनच्या वेरिएंटची किंमत 15,999 रुपये इतकी आहे.
फोनच्या पहिल्या सेलदरम्यान उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, पहिल्या सेलमध्ये, ICICI आणि SBI बँक कार्डवर 1000-1000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. तसेच, बेस व्हेरियंट व्यतिरिक्त इतर दोन व्हेरियंटवर 500 रुपयांची कूपन सूट देखील उपलब्ध असेल. यासह तुम्ही हा बजेट फ्रेंडली फोन आणखी कमी किमतीत खरेदी करू शकतात.
iQOO Z9x 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
iQOO Z9x 5G स्मार्टफोनमध्ये 6.72 इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 120Hz इतका आहे. हा फोन कंपनीने फक्त एकाच स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे. स्मार्टफोनमध्ये 8GB रॅमसोबत 8GB व्हर्च्युअल रॅमचा पर्यायही उपलब्ध आहे. तर, स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येईल. लक्षात घ्या की, हा फोन त्याच्या सेगमेंटमधील सर्वात स्लिम फोन आहे, असा कंपनीचा दावा आहे. परफॉर्मन्ससाठी हा फोन Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसरद्वारे सुसज्ज आहे. फोनला डस्ट आणि पाण्यापासून बचावासाठी IP64 रेटिंग देण्यात आली आहे.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP मेन AI कॅमेरा बसवण्यात आला आहे. त्याबरोबरच, फोनच्या मागील बाजूस 2MP डेप्थ लेन्स आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोर 8MP कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 6000mAh बॅटरी आहे, जी 44W फ्लॅशचार्जला सपोर्ट करेल. हा फोन 30 मिनिटांसाठी चार्ज करून तुम्ही 10 तास व्हिडिओ पाहण्यास सक्षम असाल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile