लेटेस्ट iQOO Z9s Pro फोनची आज पहिली Sale आज भारतात होणार सुरु, जाणून घ्या Best ऑफर्स
iQQO ने नुकतेच iQOO Z9s Pro स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला.
iQOO Z9s Pro ची पहिली सेल आज म्हणजेच 23 ऑगस्ट रोजी भारतात सुरु होणार
पहिल्या सेलदरम्यान तुम्हाला iQOO Z9s Pro फोनवर 3000 रुपयांची सवलत मिळणार आहे.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQQO ने नुकतेच iQOO Z9s Pro स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. त्यानुसार, iQOO Z9s Pro ची पहिली सेल आज म्हणजेच 23 ऑगस्ट रोजी भारतात सुरु होणार आहे. ही सेल ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Amazon India वर दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होईल. पहिल्या सेलदरम्यान, या स्मार्टफोनवर तुम्हाला मोठ्या सवलती आणि स्वस्त EMI वर फोन खरेदी करण्याची संधी मिळेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात iQOO Z9s Pro फोनची किंमत आणि ऑफर्स-
Unleash the power of #FullyLoadedForMegaTaskers with the iQOO Z9s Series! 🚀 Starting at just ₹17,999*, experience blazing speed, a stunning 50 MP Sony AI Camera, and so much more. Sale goes live on 23rd August @amazonIN & https://t.co/75ueLp6Bm1#AmazonSpecials #iQOO… pic.twitter.com/gIjtG9i6e0
— iQOO India (@IqooInd) August 22, 2024
Also Read: iPhone युजर्स सावधान! चुकूनही ‘ही’ कॅरेक्टर्स फोनवर टाइप करू नका, अन्यथा…
iQOO Z9s Pro फोनची किंमत आणि ऑफर्स
iQOO ने Z9S Pro च्या 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 24,999 रुपये इतकी आहे. तर, त्याच्या 8GB+256GB व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये इतकी आहे. त्याबरोबरच, फोनचे 12GB+256GB स्टोरेज मॉडेल तुम्हाला 28,999 रुपयांना मिळेल.
फोनवर उपलब्ध पहिल्या सेलमधील ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर तुम्हाला 3000 रुपयांची सवलत मिळणार आहे. एवढेच नाही तर, या फोनवर परवडणारे EMI आणि एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध असणार आहेत.
iQOO Z9s Pro चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
नवा iQOO Z9s Pro या स्मार्टफोनमध्ये 6.77 इंच लांबीचा फुल HD AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये Qualcomm चा Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर उपलब्ध आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 12GB रॅम, 256GB पर्यंत स्टोरेज मिळेल. डेटा सुरक्षिततेसाठी यात फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फंक्शन आहे.
फोटोग्राफीसाठी, या स्मार्टफोनच्या मागील बाजूस 50MP Sony IMX 882 आणि 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स देण्यात आली आहे. तर, डिव्हाइसच्या समोर एक 16MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध असेल. या iQOO स्मार्टफोनमध्ये मजबूत 5500mAh बॅटरी आहे, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. याशिवाय, कनेक्टिव्हिटीसाठी, या फोनमध्ये ड्युअल सिम स्लॉट, Wi-Fi, GPS, ब्लूटूथ आणि USB टाइप-C पोर्ट देखील देण्यात आले आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile