50MP कॅमेरासह येणाऱ्या iQOO Z9s 5G ची पहिली Sale आज, प्रचंड सवलतीत मिळेल नवा स्मार्टफोन
iQOO ने iQOO Z9s 5G नवा स्मार्टफोन अलीकडेच भारतात लाँच केला.
iQOO Z9s 5G ची पहिली सेल 29 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल.
ICICI आणि HDFC बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यावर 2000 रुपयांची सूट मिळेल.
लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता iQOO ने iQOO Z9s 5G नवा स्मार्टफोन अलीकडेच भारतात लाँच केला आहे. त्यानंतर, आज या स्मार्टफोनची पहिली विक्री आज 29 ऑगस्ट 2024 पासून सुरू होणार आहे. पहिल्या सेलअंतर्गत स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने गेल्या आठवड्यात लाँच केलेल्या iQOO Z9s सीरीज अंतर्गत दोन स्मार्टफोन सादर केले होते. त्यापैकी, iQOO Z9s 5G आजपासून विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाईल. जाणून घेऊयात iQOO Z9s 5G वरील पहिल्या सेलमधील ऑफर्स आणि सर्व तपशील-
iQOO Z9s 5G ची पहिली Sale
iQOO Z9s 5G ची पहिली सेल 29 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. हे लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वरून खरेदी करता येतील. या फोनच्या बेस व्हेरिएंटची म्हणजेच 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपयांपासून सुरू होते. तर, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे.
Get ready to make a statement with the Segment’s Slimmest Curved Display Phone* – the #iQOOZ9s. With a powerful 5500mAh battery in an impressively slim 0.749cm design.
— iQOO India (@IqooInd) August 27, 2024
Sale goes live on 29th August, 12PM @amazonIN & https://t.co/75ueLp6Bm1 pic.twitter.com/qTUvFEpxT0
तर, 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येणाऱ्या व्हेरिएंटची किंमत 23,999 रुपये इतकी आहे. पहिल्या सेलमध्ये मिळणाऱ्या ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला ICICI आणि HDFC बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यावर 2000 रुपयांची सूट मिळणार आहे. Buy From Here
iQOO Z9s 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
iQOO Z9s 5G फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा 3D कर्व AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या हँडसेटमध्ये MediaTek Dimensity 7300 5G प्रोसेसर उपलब्ध आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 12GB पर्यंत RAM सह 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज मिळणार आहे. हा फोन Android 14 वर आधारित Funtouch OS 14 वर चालतो.
फोटोग्राफीसाठी, OIS सपोर्टसह 50MP मुख्य कॅमेरा आणि 2MP सेकंड कॅमेरा या फोनच्या मागील बाजूस उपलब्ध आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोर 16MP कॅमेरा देण्यात आला आहे. जर तुम्ही सेल्फी काढण्याचे शौकीन असाल तर, हा सेल्फी कॅमेरा तुमच्यासाठी अप्रतिम आहे. हा स्मार्टफोन 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5500mAh बॅटरीसह येतो. चार्जिंगसाठी यात यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile