प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQOO च्या आगामी iQOO Neo 10 Pro फोनच्या लाँचची चर्चा टेक विश्वात सुरु झाली आहे. आगामी फोनचे फीचर्स लाँच होण्यापूर्वी ऑनलाइन लीक करण्यात येत आहेत. लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार, कंपनी iQOO Neo 10 सीरीज अंतर्गत 2 फोन लाँच करणार आहे. यामध्ये iQOO Neo 10 आणि iQOO Neo 10 Pro मॉडेल्सचा समावेश असेल. लेटेस्ट लीकमध्ये iQOO Neo 10 Pro फोनचे फीचर्स समोर आले आहेत. जाणून घेऊयात iQOO Neo 10 Pro चे लीक तपशील-
Also Read: Best Smartphones Under 30000: मिड बजेटमध्ये लेटेस्ट 5G स्मार्टफोन्स भारतात उपलब्ध, पहा संपूर्ण यादी
एका प्रसिद्ध टीपस्टरने iQOO Neo 10 Pro फोनची फीचर्स ऑनलाइन लीक केली आहेत. लीकबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 6.78 इंच लांबीच्या फ्लॅट डिस्प्लेसह येऊ शकतो. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 1.5K असेल आणि रिफ्रेश रेट 144Hz इतका असेल. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन MediaTek Dimensity 9400 प्रोसेसरद्वारे सुसज्ज असेल. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 16GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे. सुरक्षेसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असण्याचीही अपेक्षा आहे.
फोनचे कॅमेरा तपशील देखील लीक झाले आहेत. लीकनुसार, फोटोग्राफीसाठी iQOO Neo 10 Pro फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. या सेटअपमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा आणि फक्त 50MP सेकंडरी कॅमेरा असू शकतो. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा दिला जाण्याची अपेक्षा आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, फोनची बॅटरी 6000mAh असेल, ज्यामध्ये 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो.
iQOO Neo 10 Pro सह iQOO Neo 10 चे फीचर्स देखील ऑनलाईन लीक करण्यात आले आहेत. लीकनुसार, परफॉर्मन्ससाठी हा फोन Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरद्वारे सुसज्ज असू शकतो. त्याबरोबरच, हा फोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअप सह देखील दाखल होईल, असे बोलले जात आहे. कॅमेरा सेटअपमध्ये यात 50MP प्राथमिक आणि 8MP सेकंडरी कॅमेरा मिळणार आहे.