iQOO 13 Pre-Booking: नुकतेच लाँच झालेल्या फ्लॅगशिप फोनची प्री-बुकिंग सुरु, पहा Best ऑफर्स

Updated on 05-Dec-2024
HIGHLIGHTS

iQOO ने बहुप्रतिक्षीत iQOO 13 स्मार्टफोन अलीकडेच भारतीय बाजारात लाँच केला.

नवीनतम iQOO 13 फोनची प्री-बुकिंग भारतीय बाजारात सुरु

हा फोन Qualcomm च्या नवीनतम Snapdragon 8 Elite चिपसेटसह लाँच

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQOO ने बहुप्रतिक्षीत iQOO 13 स्मार्टफोन अलीकडेच भारतीय बाजारात लाँच केला आहे. या नवीनतम iQOO 13 फोनची प्री-बुकिंग भारतीय बाजारात सुरु झाली आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Qualcomm च्या नवीनतम Snapdragon 8 Elite चिपसेटसह लाँच करण्यात आला आहे. प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना अनेक आकर्षक ऑफर्स मिळणार आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात ऑफर्स-

Also Read: Price Cut! 6000mAh बॅटरीसह येणाऱ्या लोकप्रिय Vivo स्मार्टफोनच्या किमतीत घट, जाणून घ्या नवी किंमत

iQOO 13 ची किंमत

iQOO ने 512GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजसह दोन प्रकारांमध्ये फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर केला आहे. या फोनच्या 12GB+256GB व्हेरिएंटची किंमत 54,999 रुपये इतकी आहे. तर, फोनच्या 16GB+512GB व्हेरिएंटची किमत 59,999 रुपये इतकी आहे. ग्राहक आज 5 डिसेंबरपासून Amazon India आणि iQOO इंडिया ई-स्टोअरवर 999 रुपये भरून फ्लॅगशिप स्मार्टफोनची प्री-बुकिंग करू शकतात.

लक्षात घ्या की, प्री-बुक केलेले ग्राहक प्री-बुकिंग ऑफरचा लाभ घेण्यासाठी 10 डिसेंबर रोजी शिल्लक रक्कम भरू शकतात. प्री-बुकिंग ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, 12 महिन्यांची विस्तारित वॉरंटी, 2,000 रुपयांचे iQOO TWS 1e मोफत, HDFC बँक आणि ICICI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डधारकांसाठी 3,000 रुपयांची झटपट सूट, iQOO किंवा Vivo स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी अतिरिक्त 2,000 रुपयांचे लॉयल्टी एक्सचेंज बोनस आणि नऊ महिन्यांपर्यंतचा नो कॉस्ट EMI मिळतील.

iQOO-13-5G

iQOO 13 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता लेटेस्ट iQOO 13 मध्ये 6.82 इंच लांबीचा LTPO AMOLED Q10 डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz इतका आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, फोनमध्ये विशेषतः कॅमेरा मॉड्यूलच्या आसपास एक हॅलो लाइटिंग देखील आहे, जे कॉल आणि मॅसेज नोटिफिकेशन्स देतो. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 50MP मुख्य Sony IMX921 कॅमेरा, 50MP Samsung अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 50MP Sony IMX816 टेलिफोटो कॅमेरा आहे. सेल्फीसाठी यात 32MP फ्रंट कॅमेरा असेल. पॉवर बॅकअपसाठी, 120W चार्जरसह 6000mAh बॅटरी आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :