अखेर पॉवरफुल आणि बहुप्रतिक्षीत गेमिंग फोन iQOO 13 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
अखेर कंपनीने नवीनतम iQOO 13 भारतीय बाजारात लाँच केला.
iQOO 13 फोनची प्री-बुकिंग 5 डिसेंबरपासून Amazon वर दुपारी 12 वाजता सुरू होईल.
iQOO 13 च्या कॅमेरा मॉड्यूलच्या आसपास 'मॉन्स्टर हॅलो' लाइट इफेक्ट देण्यात आला आहे.
iQOO 13 Launched: प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQOO च्या आगामी स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची प्रतीक्षा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. मात्र, अखेर कंपनीने नवीनतम iQOO 13 भारतीय बाजारात लाँच केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन मजबूत मोबाइल चिपसेट स्नॅपड्रॅगन 8 एलिटच्या सामर्थ्यासह येतो, जी गेमिंगसाठी सर्वोत्तम फोन बनवते. स्टायलिश लुक, उत्कृष्ट फीचर्स आणि पॉवरफुल फीचर्ससह सुसज्ज iQOO 13 ची किंमत आणि सर्व तपशील जाणून घेऊयात-
Also Read: लेटेस्ट Oppo Find X8 सिरीजची भारतात पहिली सेल आज! नव्या फोनवर जबरदस्त ऑफर्स उपलब्ध
Bold. Refined. Unstoppable. ⚡Introducing the #iQOO13 Nardo Grey Edition—where power meets precision, designed for those who demand nothing but the best.
— iQOO India (@IqooInd) December 3, 2024
Inspired by the iconic Nardo Ring in Italy, this shade captures the essence of anthracite-gray asphalt, symbolizing speed and… pic.twitter.com/plNnHfkD36
iQOO 13 ची भारतीय किंमत
iQOO 13 फोनच्या 16GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 54,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर, 16GB रॅम आणि 512GB स्टोरेजची किंमत 59,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात HDFC बँक आणि ICICI बँकेच्या ग्राहकांना 3000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. यासोबतच, एक्सचेंज ऑफर आणि नो-कॉस्ट EMI चा पर्यायही दिला जात आहे.
उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची प्री-बुकिंग 5 डिसेंबरपासून Amazon वर दुपारी 12 वाजता सुरू होईल. तर, 3 डिसेंबरला दुपारी 2 वाजल्यापासून कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून प्री-बुकिंग करता येईल. तर, 11 डिसेंबरपासून दुपारी 12 वाजता फोन Amazon India वर उपलब्ध करून दिला जाईल.
iQOO 13 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
iQOO 13 5G फोन 6.82-इंच लांबीच्या पंच-होल स्क्रीनवर लाँच करण्यात आला आहे. हा Q10 2k 144Hz अल्ट्रा आयकेअर डिस्प्ले असेलला जगातील पहिला फोन आहे, असे कंपनीने सांगितले. ही 8T LTPO स्क्रीन आहे, ज्यामध्ये 144Hz रिफ्रेश रेटचा सपोर्ट आहे. iQOO 13 च्या कॅमेरा मॉड्यूलच्या आसपास ‘मॉन्स्टर हॅलो’ लाइट इफेक्ट देण्यात आला आहे. कॉल, मेसेज, नोटिफिकेशन किंवा चार्ज दरम्यान हे इंडिकेटर म्हणून काम करते.
लक्षात घ्या की, कंपनीने हा फोन इन-डिस्प्ले अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर तंत्रज्ञानाद्वारे सुसज्ज केला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये Qualcomm चा सर्वात पॉवरफुल मोबाईल चिपसेट Snapdragon 8 Elite दिला गेला आहे.
फोटोग्राफीसाठी, iQOO 13 5G स्मार्टफोन ट्रिपल रिअर कॅमेऱ्याला सपोर्टसह येतो. यामध्ये OIS तंत्रज्ञानासह 50MP Sony IMX921 मुख्य सेन्सर, 50MP Samsung S5KJN1 अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 50MP Sony IMX816 टेलिफोटो लेन्स प्रदान केले आहेत. तर, सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा मिळेल. पॉवर बॅकअपसाठी, हा फोन 6,000 mAh बॅटरीला सपोर्ट करतो, जी 120W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह येते.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile