iQOO 13 First Sale: लेटेस्ट स्मार्टफोनची पहिली सेल भारतात आजपासून होणार सुरु, पहा ऑफर्स

Updated on 11-Dec-2024
HIGHLIGHTS

iQOO ने नुकतेच भारतीय बाजारात iQOO 13 स्मार्टफोन लाँच केला.

हा स्मार्टफोन Amazon India वर खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे.

ICICI आणि HDFC बँकेकडून यावर 3000 रुपयांची सूट मिळणार आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQOO ने नुकतेच भारतीय बाजारात iQOO 13 स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनच्या लाँचची प्रतीक्षा गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय बाजारात सुरु होती. दरम्यान, आजपासून या स्मार्टफोनची पहिली सेल भारतात सुरु होणार आहे. ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Amazon India वर दुपारी 12 वाजता ही सेल लाइव्ह होणार आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये नवीनतम स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर उपलब्ध आहे. याशिवाय, हँडसेटमध्ये 6000mAh जंबो बॅटरी देखील मिळेल. चला तर मग जाणून घेऊयात iQOO 13 ची किंमत, ऑफर्स आणि सर्व तपशील-

Also Read: Myntra Refund Scam: अरे बापरे! जयपूर गॅंगने केली Myntra ची तब्बल 1 कोटी रुपयांची फसवणूक, वाचा डिटेल्स

iQOO 13 ची किंमत आणि ऑफर्स

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQOO ने iQOO 13 5G फोन 12GB+256GB आणि 16GB+512GB या दोन व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे. या फोनची किंमत अनुक्रमे 54,999 रुपये आणि 59,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. वर सांगितल्याप्रमाणे, हा स्मार्टफोन Amazon India वर खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ICICI आणि HDFC बँकेकडून यावर 3000 रुपयांची सूट मिळणार आहे. त्याबरोबरच, 5000 रुपयांपर्यंतचा एक्स्ट्रा एक्सचेंज बोनसही दिला जात आहे. तसेच, या फोनवर परवडणारी EMI देखील आहे.

iQOO 13 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

iQOO 13 स्मार्टफोनमध्ये 6.82 इंच लांबीचा AMOLED फ्लॅट डिस्प्ले देण्यात आला आहे, रिफ्रेश रेट 144Hz इतका आहे. यात HDR 10+ चा सपोर्ट मिळेल. उत्तम कामकाजासाठी, या हँडसेटमध्ये Qualcomm ची Snapdragon 8 Elite चिप देण्यात आली आहे. हा फोन पाण्याच्या प्रतिकारासाठी IP68 आणि IP69 चे रेटिंग देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन Android 15 वर आधारित Funtouch OS 15 वर कार्य करेल. पॉवर बॅकअपसाठी, या डिव्हाइसमध्ये मोठी 6000mAh बॅटरी आहे, जी 120W फ्लॅश चार्ज फास्ट चार्जिंगच्या समर्थनासह येते.

iQOO-13-5G

फोटोग्राफीसाठी, iQOO 13 च्या मागील बाजूस LED फ्लॅश लाइटसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये तुम्हाला 50MP Sony IMX921 सेन्सर, 50MP अल्ट्रा-वाइड आणि 50MP 2X टेलिफोटो लेन्स मिळणार आहे. तसेच, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी यात 32MP फ्रंट कॅमेरा देखील उपलब्ध आहे. यासह, हँडसेटमध्ये नाइट, पोर्ट्रेट, व्हिडिओ, स्लो मोशन, सुपरमून आणि HD सारखे कॅमेरा फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच सुरक्षिततेसाठी, या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकची सुविधा आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :