मागील काही काळापासून IQOO च्या आगामी स्मार्टफोन सिरीजच्या भारतीय लाँचची चर्चा टेक विश्वात जोरात सुरु होती. आता अखेर बऱ्याच प्रतीक्षेनंतर iQOO 12 5G स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. हा कंपनीचा लेटेस्ट प्रीमियम स्मार्टफोन आहे. विशेष म्हणजे हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरसह लाँच झाला आहे. जाणून घेऊयात फोनची किंमत, उपलब्धता आणि स्पेसिफिकेशनशी संबंधित सर्व माहिती.
iQOO 12 स्मार्टफोनच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 52,999 रुपये आहे. तर, हे 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज वेरिएंटमध्ये येते, ज्याची किंमत 57,999 रुपये आहे. कंपनीने हा फोन ब्लॅक आणि व्हाईट अशा दोन कलर ऑप्शन्समध्ये सादर केला आहे.
या फोनवरील उपलध ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ICICI आणि HDFC बँक कार्डद्वारे 3000 रुपयांपर्यंत सूट मिळेल. या ऑफरचा लाभ घेतला तर लेटेस्ट स्मार्टफोन सिरीजची किंमत 49,999 आणि 54,999 रुपये इतकी असेल. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, फोनची विक्री Amazon India आणि IQOO India वर 14 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, 13 डिसेंबरपासून प्राधान्य वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल.
iQOO 12 स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1.5K पिक्सेल आहे. हा डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेटच्या सपोर्टसह आहे. त्याबरोबरच, वर सांगितल्याप्रमाणे फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. या फोनमध्ये Q1 सुपर कॉम्प्युटिंग गेमिंग चिप देखील देण्यात आली आहे. हा फोन Android 14 आधारित Funtouch OS 14 वर काम करतो. फोनमध्ये 16GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे. सुरक्षिततेसाठी यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्यामध्ये OIS सपोर्टसह 50MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर, 50MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि एक 64MP पेरिस्कोप टेलीफोटो सेन्सर देखील आहे, जो 3x ऑप्टिकल झूमसह येतो. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी हा फोन 16MP फ्रंट कॅमेरासह येतो. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे, जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.