iPhone 16 Vs iPhone 15: लेटेस्ट आयफोन जुन्या मॉडेलपेक्षा किती वेगळा आणि ऍडव्हान्स? पहा डिटेल्स 

iPhone 16 Vs iPhone 15: लेटेस्ट आयफोन जुन्या मॉडेलपेक्षा किती वेगळा आणि ऍडव्हान्स? पहा डिटेल्स 
HIGHLIGHTS

iPhone 16 पेक्षा iPhone 15 च्या फीचर्सद्वारे दोन्ही फोन्सची तुलना

iPhone 16 मध्ये वर्टिकल शेपचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

iPhone 16 आणि iPhone 15 हे दोन्ही IP68 प्रमाणित आहेत, जे 6 मीटर खोल पाण्यात तब्बल 30 मिनिटांपर्यंत टिकू शकतात.

iPhone चाहते नव्या iPhone 16 सिरीजची आतुरतेने वाट पाहत होते. आता अखेर ही सिरीज लाँच करण्यात आली आहे. यंदा कंपनीने नवीन iPhone सह आपल्या डिझाइनमध्ये बदल केला आहे. एवढेच नाही तर, काही नवीन फीचर्स देखील जोडण्यात आली आहेत. या फोनला मागील मॉडेल म्हणजेच iPhone 15 पेक्षा अधिक पॉवरफुल आणि ऍडव्हान्स बनवण्यात आले आहे. चला तर मग जाणून घेऊयात iPhone 16 पेक्षा iPhone 15 किती वेगळा आणि ऍडव्हान्स आहे, ते पाहुयात-

iPhone 15 आणि iPhone 16 ची किंमत

iPhone 16 79,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे. विशेष म्हणजे याच किमतीत iPhone 15 लाँच करण्यात आला होता. तर, iPhone 16 च्या 256 GB मेमरीचा दर 89,999 रुपये आणि 512 GB ची किंमत 1,09,999 रुपये आहे. दुसरीकडे, कंपनी आता iPhone 15 स्वस्त दरात उपलब्ध करणार आहे. या फोनच्या 128 GB मॉडेलचा दर 69,999 रुपये झाला आहे. तर, 256GB व्हेरिएंट iPhone 15 फोन 79,999 रुपयांना आणि 512GB मॉडेल 99,999 रुपयांना खरेदी करता येईल.

iPhone 16 and iPhone 16 Pro Launched
iPhone 16 and iPhone 16 Pro Launched

iPhone 15 vs iPhone 16

डिझाईन

iPhone 16 सह Apple ने आपल्या नवीन मोबाईलच्या डिझाईनमध्ये मोठा बदल केला आहे. आत्तापर्यंत, सर्व iPhones मध्ये रिंग (सायलेंट) स्विच प्रदान केले गेले होते. परंतु नवीन आयफोन सिरीजसह कंपनीने ॲक्शन बटण सादर केले आहे. iPhone 16 सिरीजसोबत Apple ने एक नवीन टच सेन्सिंग बटण कॅमेरा कंट्रोल देखील आणले आहे, जे मोबाईलच्या उजव्या फ्रेमवर स्थापित आहे. iPhone 16 मध्ये वर्टिकल शेपचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर, नवीन iPhone 16 मध्ये दोन्ही मागील सेन्सर एका लाईनमध्ये ठेवलेले आहेत आणि फ्लॅश लाइट त्यांच्या बाजूला आहे.

iPhone 15 मध्ये, मागील पॅनेलवर एक चौरस आकार दिला होता, त्याच्या आत एक तिरकस शेप कॅमेरा सेन्सर आणि फ्लॅश ठेवण्यात आला होता. iPhone 15 आणि iPhone 16 चे डायमेन्शन समान आहेत. हे दोन्ही फोन ॲल्युमिनियम फ्रेम बॉडीवर बनवले आहेत, ज्यावर काचेची लेयर आहे. iPhone 16 आणि iPhone 15 हे दोन्ही IP68 प्रमाणित आहेत, जे 6 मीटर खोल पाण्यात तब्बल 30 मिनिटांपर्यंत टिकू शकतात.

डिस्प्ले

Apple ने आपल्या नवीन iPhone 16 च्या डिस्प्लेमध्ये तसेच डिझाइनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्याची स्क्रीन पूर्णपणे iPhone 15 सारखी आहे. हे दोन्ही मोबाईल 6.1 इंच लांबीच्या सुपर रेटिना XDR OLED डिस्प्लेला सपोर्ट करतात. विषेश म्हणजे iPhone 16 1nit ब्राइटनेस पर्यंत आउटपुट देऊ शकतो, ज्यामुळे रात्री फोन पाहताना विशेषतः झोपेच्या वेळी हानी होणार नाही.

प्रोसेसर

Apple चा A18 Bionic चिपसेट iPhone 16 मध्ये प्रोसेसिंगसाठी देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की, आयफोन 15 मध्ये असलेल्या A18 बायोनिक चिपपेक्षा ते 2x वेगवान आहे. iPhone 15 मध्ये A16 बायोनिक चिप उपलब्ध आहे. नवीन iPhone 16 मध्ये उपस्थित 5-कोर GPU iPhone 15 च्या A16 Bionic च्या तुलनेत 40% वेगवान आणि 35% कार्यक्षम आहे, असा कंपनीचा दावा आहे.

Apple iPhone 16 vs iphone 15

कॅमेरा

iPhone 16 फोनमध्ये 48MP फ्यूजन कॅमेरा आहे, जो आवश्यकतेनुसार 12MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स म्हणून देखील काम करू शकतो. ज्याद्वारे वापरकर्ते त्यांच्या आवडीनुसार फोटो काढू शकतात. हा कॅमेरा अँटी-रिफ्लेक्टीव्ह लेन्स कोटिंगसह सादर केला गेला आहे. ज्यामध्ये Spatial photos आणि Macro सारखी फीचर्स देण्यात आली आहेत, जी iPhone 15 मध्ये नव्हती. या दोन्ही मोबाईलमध्ये 12MP अल्ट्रा वाइड बॅक कॅमेरा आहे. iPhone 15 मध्ये ही लेन्स F/2.4 अपर्चरवर काम करते, तर iPhone 16 मध्ये ते F/2.2 सह आणले गेले आहे.

फ्रंट कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, इथेही दोन्ही iPhone सारखेच आहेत. यात 12MP TrueDepth फ्रंट कॅमेरा मिळतो, जो F/1.8 अपर्चरवर कार्य करतो.

बॅटरी

Apple ने अद्याप iPhone 16 च्या बॅटरी पॉवरबद्दल संपूर्ण माहिती दिलेली नाही, परंतु हा फोन 3,561 mAh बॅटरीसह येऊ शकतो. पूर्ण चार्ज केल्यानंतर, फोन 22 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक आणि 80 तासांचा ऑडिओ प्लेबॅक देऊ शकतो, असा कंपनीचा दावा आहे. iPhone 15 चा बॅटरी बॅकअप यापेक्षा थोडा कमी होता. दोन्ही iPhone मध्ये MagSafe आणि Qi वायरलेस चार्जिंग तंत्रज्ञान आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo