नवीनतम iPhone 16 सिरीजची भारतीय किंमत जाहीर, जाणून घ्या तुमच्या बजेटमध्ये बसतेय का किंमत? 

नवीनतम iPhone 16 सिरीजची भारतीय किंमत जाहीर, जाणून घ्या तुमच्या बजेटमध्ये बसतेय का किंमत? 
HIGHLIGHTS

Apple ने iPhone 16 सिरीजची भारतीय किंमत जाहीर केली.

iPhone 16 सिरीजची सुरुवातीची किंमत 79,900 रुपये इतकी आहे.

iPhone 16 सिरीजच्या सर्व स्मार्टफोन्सची प्री-बुकिंग 20 सप्टेंबरपासून सुरु होणार

Apple iPhone 16 सिरीज अखेर भारतात लाँच करण्यात आली आहे. या सिरीजची iPhone लव्हर्स मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. तसेच, अनेकांनी तर iPhone 16 सिरीज लाँच होण्यापूर्वीच ते खरेदी करण्यासाठी आपल्या बजेटची तयारी देखील केली असावी. दरम्यान, कंपनीने iPhone 16 सिरीजची भारतीय किंमत देखील जाहीर केली आहे. लेटेस्ट iPhone 16 सिरीज अंतर्गत कंपनीने iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max असे चार व्हेरिएंट लाँच केले गेले आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवत जाणून घेऊयात नवीनतम iPhone 16 सिरीजची भारतीय किंमत-

iPhone 16 ची भारतीय किंमत

लेटेस्ट iPhone 16 स्मार्टफोन 3 व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनच्या 128GB बेस मॉडेलची किंमत 79,900 रुपयांपासून सुरू होते. तर, 256GB मॉडेलची किंमत 89,900 रुपये आहे. याव्यतिरिक्त, 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 1,09,900 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. iPhone 16 फोनबद्दल सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.

iPhone 16 Plus ची भारतीय किंमत

iPhone 16 Plus फोन सुद्धा 3 व्हेरिएंटसह सादर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 128GB बेस मॉडेलची किंमत 89,900 रुपयांपासून सुरू होते. तर, 256GB मॉडेलची किंमत 99,900 रुपये आहे. याव्यतिरिक्त, 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 1,19,900 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. iPhone 16 Plus फोनबद्दल सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.

iPhone 16 Pro ची भारतीय किंमत

लेटेस्ट iPhone 16 Pro स्मार्टफोन 4 व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनच्या 128GB बेस मॉडेलची किंमत 1,19,900 रुपये इतकी आहे. तर, 256GB मॉडेलची किंमत 1,29,900 रुपये आहे. त्याबरोबरच, या स्मार्टफोनच्या 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 1,49,900 रुपये निश्चित करण्यात आली आहे. अखेर, या फोनच्या 1TB मॉडेलची किंमत 1,69,900 रुपये आहे. iPhone 16 Pro फोनबद्दल सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.

iPhone 16 and iPhone 16 Pro Launched

iPhone 16 Pro MAX ची भारतीय किंमत

iPhone 16 सिरीजचा टॉप मॉडेल लेटेस्ट iPhone 16 Pro MAX फोन 3 व्हेरिएंटसह सादर करण्यात आला आहे. या फोनच्या 256GB बेस मॉडेलची किंमत 1,44,900 रुपयांपासून सुरू होते. त्याबरोबरच, 512GB मॉडेलची किंमत 1,64,900 रुपये इतकी निश्चित केली गेली आहे. याव्यतिरिक्त, 1TB स्टोरेज वेरिएंटची किंमत 1,84,900 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. iPhone 16 Pro MAX फोनबद्दल सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo