लेटेस्ट iPhone 16 सिरीजची पहिली Sale भारतात आज, हजारो रुपयांची बचत करण्याची संधी 

लेटेस्ट iPhone 16 सिरीजची पहिली Sale भारतात आज, हजारो रुपयांची बचत करण्याची संधी 
HIGHLIGHTS

अखेर आज iPhone 16 सीरिजच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपत आली आहे.

20 सप्टेंबरपासून या नवीनतम iPhone 16 सीरीजची ग्राहकांसाठी विक्री सुरू

Axis, ICICI आणि American Express बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यावर 5,000 रुपयांच्या झटपट कॅशबॅक

iPhone लव्हर्ससाठी आनंदाची बातमी आहे. अखेर आज iPhone 16 सीरिजच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपत आली आहे. Apple ने अलीकडेच नवीन iPhone सीरीज लाँच केली आहे. त्यानंतर, आजपासून म्हणजेच 20 सप्टेंबरपासून या नवीनतम Apple सीरीजची ग्राहकांसाठी विक्री सुरू होईल. iPhone 16 सीरीजमध्ये कंपनीने ग्राहकांसाठी iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max हे चार नवीन मॉडेल्स सादर करण्यात आले आहे.

Apple च्या या नवीनतम सिरीजची विक्री कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart आणि Amazon वर सुरू झाली आहे. याशिवाय कंपनीच्या दिल्ली आणि मुंबईतील अधिकृत स्टोअर्सवर देखील फोन खरेदीसाठी उपलब्ध झाले आहेत.

लेटेस्ट iPhone 16 सिरीजची पहिली Sale भारतात आज

iPhone 16 सिरीजवरील ऑफर्स

Apple च्या अधिकृत साइटवरील सूचीनुसार, तुम्हाला Axis, ICICI आणि American Express बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यावर 5,000 रुपयांच्या झटपट कॅशबॅकचा लाभ मिळेल. एवढेच नाही तर ग्राहकांच्या सोयीसाठी 3 आणि 6 महिन्यांच्या नो कॉस्ट ईएमआयचीही सुविधा आहे. एवढेच नाही तर, कंपनी जुन्या फोनची देवाणघेवाण करण्यासाठी 4,000 ते 67,500 रुपयांपर्यंत एक्सचेंज सूट देखील देत आहे.

iPhone 16 ची भारतीय किंमत

iPhone 16 फोनचे तीन व्हेरिएंट सादर करण्यात आले आहेत. फोन 128GB, 256GB आणि 512GB व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या तिन्ही व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे 79,900 रुपये, 89,900 रुपये आणि 1,09,900 रुपये इतकी आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.

iPhone 16 Plus ची भारतीय किंमत

iPhone 16 प्रमाणे iPhone 16 Plus चे देखील तीन व्हेरिएंटसह लाँच करण्यात आले आहेत. फोनच्या 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 89,900 रुपये, 256 GB वेरिएंटची किंमत 99,900 रुपये आणि 512 GB वेरिएंटची किंमत 1,19,900 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.

लेटेस्ट iPhone 16 सिरीजची पहिली Sale भारतात आज

iPhone 16 Pro ची भारतीय किंमत

तुम्हाला iPhone 16 प्रो चार व्हेरिएंटसहसादर करण्यात आला आहे. या फोनच्या 128 GB व्हेरियंटची किंमत 1,19,900 रुपये, 256 GB व्हेरिएंटची किंमत 1,29,990 रुपये, 512 GB व्हेरिएंटची किंमत 1,49,900 रुपये आणि 1 TB स्टोरेजसह टॉप व्हेरिएंटची किंमत 1,69,900 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.

iPhone 16 Pro Max भारतीय किंमत

हा फोन iPhone 16 सिरीजमधील सर्वात महागडा फोन आहे. फ्लॅगशिप फीचर्ससह या फोनचे तीन व्हेरिएंट लाँच करण्यात आले आहेत. या फोनच्या 256GB मॉडेलची किंमत 1,44,900 रुपये, 512GB मॉडेलची किंमत 1,64,900 रुपये आणि 1TB टॉप मॉडेलची किंमत 1,84,900 रुपये आहे.स्पेसिफिकेशन्सबद्दल सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये संलग्न म्हणजेच एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo