या आठवड्याच्या सुरुवातीला, Apple ने कॅलिफोर्नियामध्ये वंडरलस्ट इव्हेंटमध्ये लेटेस्ट Apple iPhone 15 सिरीज लाँच केली. या सिरीजमध्ये 4 स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max आहेत. त्याबरोबरच, iPhone लव्हर्ससाठी हे सर्व स्मार्टफोन्स आज भारतात प्री-ऑर्डरसाठी आणले जाणार आहेत.
वर सांगितल्याप्रमाणे, iPhone 15 सीरीजसाठी प्री-ऑर्डरसाठी आज उपलब्ध होणार आहे. या सिरीजची प्री-ऑर्डर आज संध्याकाळी 5:30 वाजता सुरू होणार आहे. तुम्हाला iPhone 15 सिरीज Apple ऑनलाइन स्टोअर, क्रोमा, रिलायन्स डिजिटल, फ्लिपकार्ट, विजय सेल्स आणि सर्व अधिकृत Apple रिटेल स्टोअर्सवरून प्री-ऑर्डरसाठी मिळेल. या iPhones ची विक्री 22 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
''iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max साठी प्री-ऑर्डर प्रक्रिया शुक्रवार, 15 सप्टेंबर रोजी सकाळी 5:00 वाजता सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, जपान, मेक्सिको, UAE, UK आणि US यासह 40 हून अधिक देशांतील ग्राहक ही स्मार्टफोन्स प्री-ऑर्डर करू शकतात.' 'असे कंपनीने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे.
iPhone 15 स्मार्टफोनची किंमत 128GB स्टोरेजसह 79,900 रुपये इतकी आहे. तसेच, 256GB आणि 512GB स्टोरेज मॉडेल्स अनुक्रमे 89,900 आणि 1,09,900 रुपयांना उपलब्ध आहेत.
त्याबरोबरच, iPhone 15 Plus चे 128GB स्टोरेज मॉडेल 89,900 रुपयांना खरेदी करता येईल. एवढेच नाही, तर iPhone 15 Plus च्या 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 99,900 रुपये आहे. जर तुम्हाला त्याचे 512GB स्टोरेज मॉडेल घ्यायचे असेल तर तुम्हाला ते 1,19,900 रुपयांना मिळेल.
iPhone 15 Pro स्मार्टफोनच्या 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 1,34,900 रुपये आहे. तर, त्याच्या 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 1,44,900 रुपये आहे. मात्र, जर तुम्हाला त्याचे 512GB स्टोरेज मॉडेल खरेदी करायचे असेल तर तुम्हाला ते 1,64,900 रुपयांना मिळेल. iPhone 15 Pro चे 1TB मॉडेल 1,84,900 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.
iPhone 15 Pro Max स्मार्टफोनचे 256GB मॉडेल 1,59,900 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. तर, फोनचे 512GB स्टोरेज मॉडेल 1,79,900 रुपयांना मिळेल. त्याबरोबरच, iPhone 15 Pro Max स्मार्टफोनचे 1TB मॉडेल 1,99,900 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे.