digit zero1 awards

iPhone 15 Series Price: बहुप्रतीक्षित लेटेस्ट iPhone सिरीज अखेर लाँच, जाणून घ्या भारतीय किंमत आणि विशेषता

iPhone 15 Series Price: बहुप्रतीक्षित लेटेस्ट iPhone सिरीज अखेर लाँच, जाणून घ्या भारतीय किंमत आणि विशेषता
HIGHLIGHTS

iPhone 15 सिरीज भारतात अखेर लाँच करण्यात आली आहे.

iPhone 15 सिरीजची सुरुवातीची किंमत 79,900 रुपये.

नवीन iPhone 15 सिरीजमधील सर्व उपकरणे USB टाइप C चार्जिंग आणि डायनॅमिक आयलँड फीचरसह येतात.

iPhone लव्हर्सची प्रतीक्षा अखेर संपली आहे. होय, iPhone 15 सिरीज भारतात लाँच करण्यात आली आहे. Appleची ही सिरीज मागील सिरीजच्या तुलनेत जबरदस्त हार्डवेअर आणि कॅमेरा अपग्रेडसह येते. या सिरीजमध्ये iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max अशा चार उपकरणांचा समावेश करण्यात आला आहे. त्याबरोबरच, Apple ने Apple Event 2023 मध्ये iPhone 15 Series आणि Apple Watch ही दोनच प्रोडक्ट्स लाँच केली आहेत.

चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता नव्या लेटेस्ट iPhone सिरीजची किंमत बघुयात: 

iphone 15

iPhone 15 Series Price in India 

 iPhone 15 – बेस 128GB व्हेरिएंटची किंमत 79,900 रुपये

 iPhone 15 Plus – बेस 128GB वेरिएंटची किंमत 89,900 रुपये

 iPhone 15 आणि iPhone 15 Plus भारतात 5 कलर ऑप्शन्स पिंक, येलो, ग्रीन, ब्लु आणि ब्लॅकमध्ये लाँच कलेले गेले आहेत.  

iPhone 15 Pro – बेस 128GB व्हेरिएंटची किंमत 1,34,900 रुपये. 

iPhone 15 Pro Max – बेस 256GB वेरिएंटची किंमत 1,59,900 रुपये. 

iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max भारतात ब्लॅक टायटॅनियम, व्हाइट टायटॅनियम, ब्लू टायटॅनियम आणि नॅचरल टायटॅनियम कलर ऑप्शनमध्ये येतील. 

iPhone 15 सिरीज प्री-ऑर्डर डेट 

 हे स्मार्टफोन 15 सप्टेंबरपासून भारतात प्री-ऑर्डर केले जाऊ शकतात आणि 22 सप्टेंबरपासून नवीन सिरीज विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. 

iphone 15

iPhone 15 Series Specifications 

iPhone 15 आणि iPhone 15 Plus चे मुख्य तपशील 

Apple चे हे दोन्ही बेस मॉडेल मागील वर्षी आलेल्या iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max च्या रीब्रँडेड वर्जन आहेत. हे दोन्ही डिवाइस अनुक्रमे 6.1 आणि 6.7 इंच डिस्प्लेसह येतात. यामध्ये 60Hz रिफ्रेश रेटसह डायनॅमिक आयलंड फीचर्ससह LTPO AMOLED डिस्प्ले आहेत. या दोन्ही फोनमध्ये A16 Bionic चिप वापरण्यात आली असून ते iOS 17 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, 6GB LPDDR5 रॅमसह 128GB/256GB/512GB तीन स्टोरेज व्हेरिएंटसह येतात.

 नव्या सिरीजचे कॅमेरे कंपनीने अपग्रेड केले आहेत. फोन्सच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. फोनमध्ये 48MP मेन कॅमेरा आणि 12MP सेकंडरी कॅमेरा असेल. या दोन्ही उपकरणांमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 12MP कॅमेरा आहे. 

लक्षात घ्या की, नवीन iPhone 15 सिरीजमधील सर्व उपकरणे USB टाइप C चार्जिंग सपोर्टसह येतात. यामध्ये वायर्ड आणि वायरलेस चार्जिंग फीचर्स उपलब्ध आहेत.

iphone 15

iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max चे मुख्य तपशील

वरील मॉडेलप्रमाणे हे दोन्ही उपकरणे अनुक्रमे 6.1 आणि 6.7 इंच डिस्प्लेसह येतात, हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्टसह येईल. त्याबरोबरच, या सिरीजच्या सर्व स्मार्टफोन्समध्ये डायनॅमिक आयलंड फिचर देखील उपलब्ध आहे. आम्ही तुम्हला सांगतो की, हे दोन्ही फोन Apple चे आतापर्यंतचे सर्वात पावरफुल iPhone आहेत. यामध्ये 3nm A17 Pro Bionic चिपसेट आहे.

iPhone 15 Pro फोन 128GB/256GB/512GB/1TB या चार स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. तर, iPhone 15 Pro Max फोन 256GB/512GB/1TB या तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो.

कॅमेरा स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max च्या रियरमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. फोनमध्ये 48MP मुख्य कॅमेरा आहे. तर, आणखी दोन 12MP कॅमेरे दिले आहेत. दोन्ही फोनच्या कॅमेऱ्यांमध्ये 5x ऑप्टिकल झूम सपोर्ट आहे. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 12MP ड्युअल OIS कॅमेरा आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo