Apple ने या महिन्याच्या सुरुवातीला iPhone 15 सीरीज लाँच केली होती. आयफोन 15 सिरीजची विक्री भारतासह जगातील अनेक देशांमध्ये सुरू झाली आहे. हा फोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी स्टोअरबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे देखील आपण पाहिले आहे. मात्र, हा फोन खरेदी करून ग्राहक जरा चिंतेत आहेत, लोक iPhone 15 मध्ये येणाऱ्या समस्यांबद्दल सतत तक्रारी करत आहेत. सर्वाधिक तक्रारी फोनच्या Heating प्रॉब्लेमबाबत आल्या आहेत. iPhone 15 मध्ये येणाऱ्या इतर समस्यांबद्दल जाणून घेऊयात.
नवीन iPhone वापरणाऱ्या युजर्सना फोन गरम होण्याचा सर्वाधिक त्रास होत आहे. या फोनचा कॅमेरा वापरताना गरम होत आहे, असा दावा युजर्स करत आहेत. याशिवाय गेमिंग आणि चार्ज करतानाही iPhone गरम होत आहे. त्याबरोबरच, Apple ने ओव्हरहाटिंग आयफोन तपासण्यासाठी एक अपडेट देखील जारी केले आहे.
नवीन iPhone खूपच कमकुवत असल्याचे अनेक YouTubers ने व्हिडिओमध्ये दाखवले आहे. तो सहज तुटू शकतो. नवीन आयफोनची बिल्ड क्वालिटी जुन्या आयफोन मॉडेल्सच्या तुलनेत कमकुवत असल्याचा दावा युजर्सकडून केला जात आहे.
नवीन iPhone 15 सेटअप दरम्यान फ्रिज होत आहे, अशी तक्रार अनेक वापरकर्त्यांनी केली आहे. Apple चा लोगो स्क्रीनवरून येत नव्हता. जेव्हा युजर्सने त्यांच्या जुन्या फोनवरून ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा लोकांना या समस्येचा सामना करावा लागला, अशी माहिती मिळाली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, नवीन अपडेटमध्ये या बगचे निराकरण करण्यात आले आहे.
Apple ने नवीन सिरीज लाँचदरम्यान टायटॅनियम बॉडीचा सर्वाधिक प्रचार केला. मात्र याच बॉडीचा युजर्सना खूप त्रास होतोय. फोन घाण होतोय आणि त्यावर सहज स्क्रॅच देखील येत आहेत. एवढेच नाही तर, नवीन फोन बॉक्समधून बाहेर काढताच अनेक वापरकर्त्यांनी स्क्रॅचची तक्रार देखील केली आहे.