अप्रतिम AI फीचर्ससह Infinix Zero Flip भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स
Infinix ने भारतीय बाजारात आपला पहिला फ्लिप फोन Infinix Zero Flip लाँच केला.
Infinix Zero Flip फोनवर 5000 रुपयांची सूट मिळणार आहे.
Infinix Zero Flip फोनची पहिली विक्री 24 ऑक्टोबरपासून Flipkart वर सुरु होणार
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Infinix ने भारतीय बाजारात आपला पहिला फ्लिप फोन Infinix Zero Flip लाँच केला आहे. कंपनीने हा फोन उत्कृष्ट फीचर्ससह लाँच केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या उत्कृष्ट स्मार्टफोनच्या मागील बाजूस AI फीचर्ससह दोन 50MP लेन्स उपलब्ध आहेत. डिव्हाइसमध्ये व्हर्च्युअल रॅम आणि मीडियाटेक प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. नव्या फ्लिप फोनच्या आगमनाने Motorola आणि Tecno च्या फ्लिप फोनला बाजारात मजबूत आव्हान मिळेल.
Infinix Zero Flip फोनची किंमत
लेटेस्ट Infinix Zero Flip फोन एकाच 8GB+ 512GB स्टोरेज मॉडेलमध्ये सादर करण्यात आला आहे. नव्या Infinix फ्लिप फोनची किंमत 49,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 5000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची पहिली विक्री 24 ऑक्टोबरपासून Flipkart वर सुरु होणार आहे.
The Flip is here at a special launch price of 44,999* or just at 4,999/m*
— Infinix India (@InfinixIndia) October 17, 2024
Sale starts from 24th October
Only on Flipkart https://t.co/aaQLnjsdij#ZeroFlip#WhatTheFlip
Infinix Zero Flip चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
नव्या Infinix Zero Flip फोनमध्ये 3.64 इंच लांबीचा AMOLED कव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनच्या मुख्य AMOLED स्क्रीन साईज 6.9 इंच आहे. या दोन्ही डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी, गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 फोनच्या कव्हर स्क्रीनवर आहे आणि मुख्य डिस्प्लेला UTG प्रोटेक्शन मिळाले आहे. यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फंक्शन आहे. या डिव्हाईसमध्ये JBL स्पीकरही बसवले आहेत.
फोटोग्राफीसाठी, कंपनीच्या पहिल्या फ्लिप फोनमध्ये OIS सह 50MP प्रायमरी सेन्सर आणि 50MP अल्ट्रा-वाइड लेन्स आहे. त्याबरोबरच, आकर्षक सेल्फीसाठी 50MP कॅमेरा देखील उपलब्ध आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 70W जलद चार्जिंग आणि 10W रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करणारी 4720mAh बॅटरी आहे. हा स्मार्टफोन Android 14 आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करेल. परफॉर्मन्ससाठी, यात MediaTek Dimensity 8020 प्रोसेसर, 8GB RAM, 8GB व्हर्च्युअल रॅम आणि 512GB UFS 3.1 स्टोरेज मिळेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile