Infinix ने आज आपला नवा स्मार्टफोन Infinix Zero 40 5G भारतात लाँच केला आहे. या स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची चर्चा बरेच दिवसांपासून सुरु आहे. हा स्मार्टफोन कंपनीने मिड बजेटमध्ये लाँच केला आहे. विशेष म्हणजे, या फोनमध्ये AI इरेजरसारखे फीचर्स उपलब्ध आहेत. याशिवाय कंपनीचा हा नवीन 5G फोन AI कट-आउट स्टिकर, AI व्लॉग आणि AI इमेज जनरेटर सारख्या अनेक जबरदस्त फीचर्ससह येतो. जाणून घेऊयात Infinix Zero 40 5G ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-
नवीनतम Infinix Zero 40 5G फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत 27,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. फोनचा बेस व्हेरिएंट 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येतो. तर, फोनच्या टॉप व्हेरिएंट 12GB रॅम सह 512GB अंतर्गत स्टोरेजसह येतो, ज्याची किंमत 30,999 रुपये आहे. हा फोन मूव्हिंग टायटॅनियम, रॉक ब्लॅक आणि व्हायलेट ग्रीन कलर ऑप्शन्ससह उपलब्ध आहे.
Infinix Zero 40 5G फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा फुल HD+ कर्व AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz इतका आहे. त्याबरोरबच, डिस्प्लेचा टच सॅम्पलिंग दर 360hz आहे. सुरक्षिततेसाठी, हा हँडसेट कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनसह येतो. उत्तम परफॉर्मन्ससाठी, हा फोन Mediatek Dimensity 8200 Ultimate प्रोसेसरद्वारे सुसज्ज आहे. हा फोन Android 14 वर आधारित XOS 14.5 वर काय करेल. पॉवर बॅकअपसाठी हा फोन 5000mAh बॅटरीसह येतो. यात 45W वायर्ड आणि 20W वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे.
फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 108MP मुख्य कॅमेरा, 50MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 50MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला GoPro Mode देखील मिळेल. GoPro क्विक ॲप प्रीइंस्टॉल केलेले शूटिंग मोड पाहण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी GoPro कॅमेऱ्यांसह एकत्रीकरण सक्षम करते. या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी AI देखील समाविष्ट आहे, जसे की ProStable Video, RAW HDR आणि विविध शूटिंग मोड उपलब्ध आहेत.