लेटेस्ट Infinix GT 20 Pro स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच, जाणून घ्या आणि टॉप 5 फीचर्स। Tech News 

लेटेस्ट Infinix GT 20 Pro स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच, जाणून घ्या आणि टॉप 5 फीचर्स। Tech News 
HIGHLIGHTS

Infinix GT 20 Pro स्मार्टफोन भारतीय बाजारात अखेर लाँच

Infinix GT 20 Pro हा स्मार्टफोन 28 मे 2024 रोजी दुपारी 12 वाजता Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध होणार

पहिल्या सेलमध्ये निवडक बँकांच्या कार्डवर 2000 रुपयांची सूट मिळेल.

बहुप्रतिक्षीत स्मार्टफोन Infinix GT 20 Pro स्मार्टफोन भारतीय बाजारात अखेर लाँच झाला आहे. हा स्मार्टफोन मिड-बजेटमध्ये या स्मार्टफोनमध्ये AMOLED डिस्प्ले आहे. यात हाय रिफ्रेश रेट आणि ब्राइटनेससह डिस्प्ले आहे. फोटोग्राफीसाठी हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. चला तर मग जाणून घेऊयात स्मार्टफोनच्या किंमती आणि सर्व स्पेसिफिकेशन्स-

हे सुद्धा वाचा: iQOO Z9x 5G स्मार्टफोनची पहिली सेल आज भारतात होणार सुरु, Best ऑफर्ससह खरेदी करण्याची संधी। Tech News

Infinix GT 20 Pro ची भारतात किंमत

Infinix GT 20 Pro फोनचा बेस व्हेरिएंट 24,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. या फोन 8GB रॅमसह 256GB अंतर्गत स्टोरेज आहे. फोनचा टॉप व्हेरिएंट 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, पहिल्या सेलमध्ये निवडक बँकांच्या कार्डवर 2000 रुपयांची सूट मिळेल. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा स्मार्टफोन 28 मे 2024 रोजी दुपारी 12 वाजता Flipkart वर सुरू होईल.

Infinix GT 20 Pro चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिझाईन

Infinix GT 20 Pro स्मार्टफोन नवीन सायबर मेचा डिझाइनसह आणला गेला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर RGB लाईट देखील देण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, मेचा लूप लाइटिंग आठ कलर कॉम्बिनेशन आणि चार लाईफ इफेक्ट देते. स्मार्टफोन मेचा ऑरेंज, मेचा सिल्व्हर आणि मेचा ब्लू या तीन कलर ऑप्शन्ससह लाँच करण्यात आला आहे.

डिस्प्ले

Infinix GT 20 Pro मध्ये 6.78 इंच लांबीचा LTPS AMOLED फुल HD+ डिस्प्ले आहे. याचे पिक्सेल रिझोल्यूशन 2436 x 1080, टच सॅम्पलिंग रेट 360Hz आणि रिफ्रेश रेट 144Hz इतका आहे.

infinix gt 20 pro features

प्रोसेसर

Infinix GT 20 Pro स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 8200 Ultimate प्रोसेसरसह येतो. हा फोन 12GB पर्यंत रॅमसह 256GB इंटर्नल स्टोरेजसह सुसज्ज आहे. फोनमध्ये Pixelworks X5 Turbo गेमिंग डिस्प्ले चिपसेट मिळत आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 108MP मेन कॅमेरा, 2MP डेप्थ सेन्सर आणि 2MP मॅक्रो लेन्स आहेत. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोर 32MP कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी

Infinix GT 20 Pro स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. ही बॅटरी वेब सर्फिंग आणि इतर मूलभूत कार्यांसह तब्बल दोन दिवसांपर्यंत चालेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo