Honor 15 फेब्रुवारी रोजी भारतात एक मोठा लाँच इव्हेंट आयोजित करणार
Htech चे CEO माधव सेठ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती
Honor X9b च्या फ्रंट कॅमेऱ्याचे तपशील शेअर केले.
Honor उद्या म्हणजेच 15 फेब्रुवारी रोजी भारतात एक मोठा लाँच इव्हेंट आयोजित करणार आहे. यामध्ये कंपनीचा आगामी स्मार्टफोन Honor X9b स्मार्टफोन लाँच केला जाईल. याबरोबरच, कंपनी नवीन स्मार्टवॉच आणि इअरबड्सचे अनावरण देखील करणार आहे. या लाँचपूर्वी आगामी उपकरणांचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स समोर येत आहेत. दरम्यान, Htech चे CEO माधव सेठ यांनी त्यांच्या नवीनतम सोशल मीडिया पोस्टमध्ये Honor X9b च्या फ्रंट कॅमेऱ्याचे तपशील शेअर केले आहेत. त्याबरोबरच, फोन कोणत्या अँड्रॉईड व्हर्जनवर चालेल हे देखील सांगण्यात आले आहे.
Honor चे CEO माधव सेठ यांनी आपल्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर अकाउंटर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये माधव यांनी सांगितले आहे की, Honor X9b मध्ये 16MP चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा असेल. त्याबरोबरच, स्मार्टफोन Android 13 OS वर चालेल, ज्यावर Magic OS 7.2 चा लेयर असेल. हा स्मार्टफोन 2 वर्षांसाठी अँड्रॉइड अपग्रेड आणि 3 वर्षांसाठी सुरक्षा अपडेट देईल. आगामी स्मार्टफोनबाबत ही माहिती माधव सेठ यांनी लाँचपूर्वी अधिकृतपणे जाहीर केली आहे.
Honor X9b चे लीक स्पेसिफिकेशन्स
लीक अहवालानुसार, Honor X9b मध्ये कर्व एजसह 6.78-इंच लांबीचा AMOLED पॅनेल असेल. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येऊ शकतो. परफॉर्मन्ससाठी हा फोन Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसरद्वारे समर्थित असेल. फोनमध्ये 8GB रॅम देखील असेल, जी 8GB पर्यंत वाढवता येईल. तर, फोनमध्ये 256GB स्टोरेज असेल.
आगामी Honor स्मार्टफोनमध्ये 108MP चा मुख्य कॅमेरा असेल. यात 5MP ची अल्ट्रा वाईड लेन्स आणि 2MP मॅक्रो कॅमेरा असण्याची शक्यता आहे. हा फोन 5,800mAh बॅटरीसह येण्याची शक्यता आहे. लीकनुसार, Honor X9b स्मार्टफोन सनशाइन ऑरेंज आणि मिडनाईट ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये लाँच होणार आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.