50MP फ्रंट कॅमेरासह HMD Fusion भारतात लाँच! स्मार्टफोनसह Smart Outfits देखील उपलब्ध, पहा किंमत

50MP फ्रंट कॅमेरासह HMD Fusion भारतात लाँच! स्मार्टफोनसह Smart Outfits देखील उपलब्ध, पहा किंमत
HIGHLIGHTS

HMD चा नवीनतम स्मार्टफोन HMD Fusion भारतात लाँच

केवळ फोनच नाही तर कंपनीने अनोखे स्मार्ट आउटफिट्स देखील सादर केले आहेत.

HMD Fusion फोनसोबत कंपनी बंडलमध्ये 5,999 रुपये किमतीचे स्मार्ट आऊटफिट्स मोफत देत आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता HMD चा नवीनतम स्मार्टफोन HMD Fusion भारतात लाँच करण्यात आला आहे. या फोनच्या भारतीय लाँचची घोषणा कंपनीने अलीकडेच केली होती. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये अनेक विशेष गोष्टी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या लाँच इव्हेंटमध्ये केवळ फोनच नाही तर कंपनीने अनोखे स्मार्ट आउटफिट्स देखील सादर केले आहेत. हे स्मार्ट आउटफिट्स अटॅच करण्यायोग्य ॲक्सेसरीज आहेत, जे केवळ फोनचा लुकच बदलत नाहीत तर त्याची कार्ये देखील वाढवतात.

Also Read: Upcoming Smartphones In December 2024: पुढील महिन्यात भारतात लाँच होणार जबरदस्त स्मार्टफोन्स, पहा यादी

विशेष म्हणजे कंपनीने गेमिंग आउटफिट सादर केले आहे, जे फिजिकल बटन्ससह येते. आऊटफिट्स देण्याचा कंपनीचा मुख्य उद्देश म्हणजेयाद्वारे युजर्सचा गेमप्ले वाढवायचा आहे. यासोबतच फ्लॅश आउटफिट देखील सादर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये आरजीबी एलईडी फ्लॅश रिंग लाइट देखील उपलब्ध आहे. पाहुयात HMD Fusion ची किंमत आणि भारतीय तपशील-

HMD launches HMD Fusion with new innovative design and features

HMD Fusion ची किंमत

लेटेस्ट HMD Fusion ची किंमत कंपनीने 17,999 इतकी निश्चित केली आहे. मात्र, विशेष लाँचअंतर्गत हा फोन काही कालावधीसाठी 15,999 रुपयांच्या किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध असेल. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे, जो तुम्ही Amazon आणि HMD च्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करू शकता.

एवढेच नाही तर, HMD Fusion फोनसोबत कंपनी बंडलमध्ये 5,999 रुपये किमतीचे HMD कॅज्युअल, फ्लॅशी आणि गेमिंग आउटफिट्स अगदी मोफतमध्ये देत आहे.

HMD Fusion चे तपशील

HMD Fusion फोनमध्ये 6.56 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, ज्यामध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजपर्यंत उपलब्ध असेल. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 108MP प्राथमिक कॅमेरा, 2MP डेप्थ सेन्सर उपलब्ध आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 50MP फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह उपलब्ध आहे. वॉटर प्रोटेक्शनसाठी या फोनला IP52 रेटिंग देण्यात आली आहे.

HMD Fusion launched in India

Smart Outfits

वर सांगितल्याप्रमाणे, कंपनी सोबत फोनसोबत स्मार्ट आउटफिट्स देखील देत आहे. गेमिंग आउटफिटबद्दल बोलायचे झाल्यास, हा एक गेम कंट्रोलर आहे. जर आपण फ्लॅश आउटफिटबद्दल बोललो तर, यात RGB LED फ्लॅश रिंग आहे, ज्यामध्ये 16 मिलियन कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo