प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता HMD ने या आठवड्याच्या सुरुवातीला HMD Fusion फोन भारतात लाँच केला. दरम्यान, या स्मार्टफोनची विक्री आजपासून म्हणजेच 29 नोव्हेंबर 2024 पासून सुरू झाली आहे. कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन 20 हजार रुपयांअंतर्गत सादर केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, पहिल्या सेलमध्ये हा स्मार्टफोन विशेष लाँच किमतीत उपलब्ध करण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेऊयात HMD Fusion वरील पहिल्या सेलमधील ऑफर्स-
Also Read: Realme GT 7 Pro 5G First Sale: 50MP कॅमेरासह येणाऱ्या लेटेस्ट स्मार्टफोनची पहिली सेल, पहा Best ऑफर्स
लेटेस्ट HMD Fusion ची पहिली विक्री आज दुपारी 12 वाजतापासून Amazon India वर सुरू झाली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा स्मार्टफोन 17,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. मात्र, विशेष लाँच किंमती अंतर्गत फोन आज 15,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो.
एवढेच नाही तर, कंपनी फोनसोबत मोफत बंडलमध्ये HMD कॅज्युअल, फ्लॅशी आणि गेमिंग आउटफिट्स देत आहे, ज्याची किंमत 5,999 रुपये आहे. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.
HMD Fusion स्मार्टफोनमध्ये 6.56 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, या डिस्प्लेचा रीफ्रेश रेट 90Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 8GB रॅमसह 256GB स्टोरेज आहे. वर सांगितल्याप्रमाणे, या फोनसोबत कंपनी स्मार्ट आउटफिट्स देत आहे. गेमिंग आउटफिटमध्ये गेम कंट्रोलरचा समावेश आहे. तसेच, फ्लॅश आउटफिटमध्ये RGB LED फ्लॅश रिंग आहे, ज्यामध्ये 16 मिलियन कलर ऑप्शन्स आहेत.
याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी HMD Fusion फोनच्या मागील बाजूस ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 108MP मुख्य कॅमेरा आणि 2MP डेप्थ लेन्सचा समावेश आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 50MP फ्रंट कॅमेरा देखील उपलब्ध आहे. या फोनला उर्जा देण्यासाठी फोनमधेय 33W फास्ट चार्जिंगसह 5000mAh बॅटरी मिळेल. त्याबरोबरच, या फोनला पाणी आणि धुळीपासून वाचवण्यासाठी IP52 रेटिंग उपलब्ध आहे.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स उपलब्ध आहेत.