लेटेस्ट HMD Crest 5G स्मार्टफोनवर भारी Discount उपलब्ध, बजेट स्मार्टफोन आणखी स्वस्तात खरेदी करण्याची संधी 

लेटेस्ट HMD Crest 5G स्मार्टफोनवर भारी Discount उपलब्ध, बजेट स्मार्टफोन आणखी स्वस्तात खरेदी करण्याची संधी 
HIGHLIGHTS

क्रेस्ट सीरीजचा नवीन HMD Crest 5G स्मार्टफोन अलीकडेच भारतात लाँच झाला.

Amazon वर HMD Crest 5G स्मार्टफोन कमी किमतीत खरेदीसाठी सूचिबद्ध

HDFC बँक क्रेडिट कार्ड EMI वर 750 रुपयांपर्यंत झटपट सूट देखील उपलब्ध

नवी प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता HMD ने आपल्या क्रेस्ट सीरीजचा नवीन HMD Crest 5G स्मार्टफोन अलीकडेच म्हणजेच जुलै महिन्यात लाँच केला. नवा स्मार्टफोन सध्या भारी सवलतीसह उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, ही सवलत मर्यादित काळासाठीच प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वर उपलब्ध असेल. लक्षात घ्या की, कंपनीच्या वेबसाइटवर डिव्हाइसची किंमत पूर्वीसारखीच आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात HMD Crest 5G ची किंमत आणि त्यावरील उपलब्ध ऑफर्स-

Also Read: Smartphones Launch This Week: ‘या’ आठवड्यात भारतात लाँच होणार भारी स्मार्टफोन्स, परवडणाऱ्या किमतीत मिळणार अप्रतिम पर्याय

hmd crest 5g phone on discount

HMD Crest 5G ची किंमत आणि ऑफर्स

Amazon वर HMD Crest 5G स्मार्टफोन फक्त 11,999 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. ही डिव्हाइसच्या 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत आहे. बँक ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनी HDFC बँक क्रेडिट कार्ड EMI वर 750 रुपयांपर्यंत झटपट सूट देणार आहे.

यासोबतच, तुम्हाला 12 महिन्यांपर्यंतच्या EMI वर 1,000 रुपयांची झटपट सूट मिळेल. तर, एक्सचेंज ऑफरसह देखील 11,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. लक्षात घ्या की, कंपनीच्या वेबसाइटवर डिव्हाइसची किंमत 14,499 रुपये इतकी आहे. येथून खरेदी करा

HMD Crest 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

HMD Crest 5G मध्ये 6.67 इंच लांबीचा HD + OLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसह या स्मार्टफोनमध्ये कामगिरीसाठी Unisoc T760 चिपसेट देण्यात आला आहे. फोनमध्ये 6GB RAM + 128GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे. तसेच, 6GB व्हर्चुअल रॅम देण्यात आली आहे. म्हणजेच तुम्ही एकूण 12GB रॅम वापरू शकता.

लेटेस्ट HMD Crest 5G स्मार्टफोनवर भारी Discount उपलब्ध

फोटोग्राफीसाठी, या HMD Crest 5G मध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आणि मागील पॅनेलवर दुसरा 2MP सेकंडरी लेन्स देण्यात आला आहे. त्याबरोबरच, स्मार्टफोनमध्ये समोर 50MP फ्रंट कॅमेरा आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, हा HMD Crest 5G फोन 5,000mAh बॅटरीद्वारे सुसज्ज आहे. फोनमधील बॅटरी 33W फास्ट चार्जिंगसह उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo