देशी स्मार्टफोन कंपनी Lava च्या लेटेस्ट Lava Blaze Duo 5G फोन अलीकडेच भारतात लाँच झाला. हा कंपनीचा नवीन बजेट फोन आहे, ज्यामध्ये दोन स्क्रीन आहेत. या फोनची विक्री आजपासून म्हणजेच 20 डिसेंबर 2024 पासून लाईव्ह झाली आहे. या फोनवर स्वस्त EMI आणि बँक डिस्काउंट सारखे लाँच ऑफर उपलब्ध आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, मागील पॅनलवरील डिस्प्लेसह सेल्फी क्लिक करता येतात. याशिवाय, हँडसेटमध्ये जलद चार्जिंग, व्हर्च्युअल रॅम आणि 6GB पर्यंत रॅमसह 5000mAh बॅटरी आहे. जाणून घेऊयात Lava Blaze Duo 5G वरील ऑफर्स-
Also Read: Realme 14 Pro Series: तापमानानुसार रंग बदलणारा फोन लवकरच होणार दाखल, Unique फीचरसह सज्ज!
नवीनतम Lava Blaze Duo 5G ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon India वर विक्रीसाठी उपलब्ध आहे. पहिल्या सेलमधील ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनवर HDFC बँकेकडून 2000 रुपयांची सूट दिली जात आहे. तसेच, 873 रुपयांची EMI आणि 15,850 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील डिव्हाइसवर उपलब्ध आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी येथे क्लिक करा.
देशी कंपनीचा नवा Lava Blaze Duo 5G अर्थातच दोन डिस्प्लेसह सादर केला गेला आहे. या फोनच्या मुख्य 3D कर्व डिस्प्ले 6.67 इंच लांबीचा आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. तर, त्याच्या मागील पॅनलमध्ये 1.58 इंच लांबीची AMOLED स्क्रीन आहे. तसेच, सुरळीत कामकाजासाठी, हँडसेटमध्ये MediaTek Dimensity 7025 चिपसेट, 128GB अंतर्गत स्टोरेज आणि 6GB RAM आहे. यात Android 14 वर कार्य करणारी ऑपरेटिंग सिस्टम देखील मिळेल.
याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये कंपनीने LED लाईटसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. तसेच, यात 64MP लेन्स आहे, जो प्राथमिक सेन्सर आहे. याशिवाय, सेटअपमध्ये 2MP सेकंडरी सेन्सर मिळेल. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी डिव्हाइसच्या समोर 16MP कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवर बॅकअपसाठी, लावाच्या नवीन स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.