आकर्षक इंटरचेंज बॅक पॅनलसह CMF Phone 1 फोन भारतीय बाजारात लाँच, प्रत्येकाच्या बजेटमध्ये आहे किंमत

Updated on 08-Jul-2024
HIGHLIGHTS

Nothing च्या सब-ब्रँड CMF चा पहिला स्मार्टफोन CMF Phone 1 भारतात लाँच

CMF Phone 1 स्मार्टफोनची भारतात सुरुवातीची किंमत 15,999 रुपये

CMF Phone 1 भारतात 12 जुलैपासून फोनची विक्री सुरू होणार

CMF Phone 1 Launched: गेल्या काही दिवसांपासून Nothing च्या सब-ब्रँड CMF चा पहिला स्मार्टफोन CMF Phone 1 च्या भारतीय लाँचची चर्चा सुरु होती. अखेर आज CMF Phone 1 भारतात लाँच करण्यात आला आहे. हा फोन इंटरचेंज बॅक पॅनलसह येतो. फोनच्या मागील पॅनलच्या बॉटमला एक स्क्रू मिळेल, जो काढला जाऊ शकतो. CMF Phone 1 स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन पॉवरफुल फीचर्ससह लाँच झाला आहे. जाणून घेऊयात CMF Phone 1 ची किंमत आणि सविस्तर तपशील-

Also Read: आगामी OnePlus Nord 4 5G फोन 16 जुलै रोजी लाँच होणार, इतर जबरदस्त प्रोडक्ट्सही होणार दाखल

CMF Phone 1 ची भारतीय किंमत

CMF Phone 1 भारतात दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. फोनच्या 6GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे. तर, 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 17,999 रुपयांच्या किमतीत सादर करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन बँक कार्डद्वारे फोनवर 2000 रुपयांची डिस्काउंट ऑफर उपलब्ध आहे.

उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, भारतात 12 जुलैपासून फोनची विक्री सुरू होणार आहे. जी तुम्ही कंपनीच्या साइट आणि Flipkart वरून खरेदी करू शकता. हा फोन ब्लॅक, ब्लु, लाईट ग्रीन आणि ऑरेंज कलर ऑप्शन्ससह खरेदी करता येईल.

CMF Phone 1 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

CMF Phone 1 फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा फुल-HD + डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन MediaTek Dimensity 7300 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. हा फोन Android 14-आधारित Nothing OS 2.6.0 वर काम करतो. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंट उपलब्ध आहे.

फोटोग्राफीसाठी CMF Phone 1 फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा EIS सपोर्टसह उपलब्ध आहे. त्याबरोबरच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये आकर्षक 16MP कॅमेरा देखील मिळणार आहे. पॉवरसाठी, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. या बॅटरीसह फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. स्मार्टफोन सिंगल चार्जवर 2 दिवसांपर्यंत चालेल, असा कंपनीचा दावा आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :