Poco M6 Pro 5G स्मार्टफोन नुकताच भारतीय बाजारात लाँच झाला असून या फोनची पहिली सेल आज ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर सुरु होणार आहे. हा स्मार्टफोन Poco M6 सीरीजचे प्रो मॉडेल म्हणून सादर करण्यात आला आहे, ज्यामध्ये बजेट यूजर्सना चांगला कॅमेरा, डिस्प्ले, प्रोसेसर सारखे फीचर्स मिळतात. हा फोन भारतात दोन 4GB RAM + 64GB आणि 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. Poco च्या या बजेट स्मार्टफोनची पहिली सेल आज दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर होणार आहे.
या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 10,999 रुपये आहे. तर, त्याचा टॉप व्हेरिएंट 12,999 रुपयांना येतो. पहिल्या सेलमध्ये, ICICI बँकेच्या कार्डवरून हा फोन खरेदी केल्यास 1,000 रुपयांची झटपट सूट मिळेल. म्हणजेच सवलतीसह स्मार्टफोन 9,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येईल. तुम्हाला नो-कॉस्ट EMI चा पर्याय देखील देण्यात आला आहे. बघुयात नव्या फोनचे तपशील-
पोकोचा हा बजेट स्मार्टफोन 6.79-इंचाच्या FHD+ डिस्प्लेसह येतो, ज्याचे रिझोल्यूशन 2460 x 1080 पिक्सेल आहे. फोनच्या डिस्प्लेला 550 nits चा पीक ब्राइटनेस मिळतो आणि 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्लेसह तुम्हाला उत्तम बघण्याचा अनुभव मिळेल. म्हणजेच, जसे वास्तविकतेत तुम्हाला चित्र दिसतात, तसेच या डिस्प्लेसह तुम्हाला फोनमधील दृश्य दिसतील.
Poco M6 Pro ला Redmi 12 5G प्रमाणे Qualcomm Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर मिळतो. चिपसेट दैनंदिन कामांमध्ये चांगली कामगिरी प्रदान करतो आणि या चिपसेटसह तुम्हाला स्मूद परफॉर्मन्स मिळणार आहे. फोनमध्ये 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत इंटर्नल स्टोरेजसाठी समर्थन आहे. या स्मार्टफोनची रॅम आणि स्टोरेज वाढवता येईल.
हा फोन Android 13 वर आधारित MIUI वर काम करतो. Android 13 ART रनटाइमच्या अपडेटद्वारे सर्व ऍप्ससाठी कार्यप्रदर्शन आणि कार्यक्षमता सुधारेल. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये 18W USB Type C फास्ट चार्जिंग फीचर उपलब्ध आहे. 5000mAh ची बॅटरी वेब सर्फ करणे आणि ईमेल तपासणे यासारख्या बेसिक कामांसह एकाच चार्जवर दोन दिवस टिकेल.
त्याबरोबरच, फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. यात 50MP मुख्य कॅमेरा आहे, ज्याच्या मागे 2MP सेकंडरी कॅमेरा आणि LED फ्लॅश आहे. प्रायमरी कॅमेरासह तुम्हाला डीटेल्ड इमेज मिळणार आहे. त्याबरोबरच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 8MP कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे, जो पंच-होल डिस्प्लेमध्ये फिट केलेला आहे. तुम्हाला जास्तीत जास्त आणि सतत सेल्फी काढण्याचा शौक असेल तर 8MP फ्रंट कॅमेरा तुमच्यासाठी उत्तम ठरेल.