प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Poco भारतात उत्तम बजेट स्मार्टफोन्स ऑफर करण्यासाठी प्रसिद्ध आहे. या आठवड्यात सुरुवातीला Poco ने भारतात दोन बजेट आणि मिड रेंज स्मार्टफोन लाँच केले आहेत. त्यापैकी बजेट रेंज स्मार्टफोन Poco C75 5G ची आज पहिली सेल आहे. ही सेल प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होणार आहे. हा स्मार्टफोन कमी किमतीत भारी फीचर्स प्रदान करतो. चला तर मग जाणून घेऊयात Poco C75 5G ची किंमत, सेल ऑफर्स आणि संपूर्ण तपशील-
Also Read: Best Offers! लेटेस्ट Samsung Galaxy S24 5G वर मिळतोय तब्बल 12000 रुपयांची सूट, पहा अप्रतिम डील
कंपनीने नवा बजेट स्मार्टफोन Poco C75 5G केवळ एकाच 4GB+ 64GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे. या मॉडेलसाठी कंपनीने 7,999 रुपये किंमत निश्चित केली आहे. पहिल्या सेलमध्ये ग्राहकांना या फोनवर भारी ऑफर्स देण्यात आल्या आहेत. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ICICI, HDFC, आणि SBI बँक कार्ड व्यवहारांवर 1,000 रुपयांची झटपट सूट मिळेल. त्यानंतर फोनची किंमत 6,999 रुपये इतकी होईल. हा फोन एन्चेंटेड ग्रीन, एक्वा ब्लू आणि सिल्व्हर स्टारडस्ट शेड्समध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा
नव्या Poco C75 5G मध्ये 6.88-इंच लांबीची HD+ LCD स्क्रीन देण्यात आली आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन स्नॅपड्रॅगन 4s Gen 2 चिपसेटसह सादर करण्यात आला आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 4GB RAM आणि 64GB अंतर्गत स्टोरेजसह समर्थित आहे, जी समर्पित microSD कार्ड स्लॉट वापरून 1TB पर्यंत वाढवता येईल. पॉवर बॅकअपसाठी, या डिव्हाइसमध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5160mAh बॅटरी आहे.
फोटोग्राफीसाठी, या स्मार्टफोनमध्ये 50MP सोनी कॅमेरा सेन्सर आणि 2MP सेकंडरी लेन्स देण्यात आली आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी या हँडसेटमध्ये 8MP सेल्फी कॅमेरा देखील देण्यात आला. फोनमध्ये धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP52 रेटिंग देखील आहे. महत्त्वाचा लक्षात घ्या की, हा हँडसेट सध्या फक्त Jio च्या 5G नेटवर्कला सपोर्ट करतो. हा Xiaomi HyperOS चालवणारा पहिला C सीरीज फोन आहे. या फोनला दोन वर्षांचे Android OS अपडेट्स आणि चार वर्षांचे सिक्युरिटी पॅच मिळतील.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स उपलब्ध आहेत.