10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत देशी कंपनी LAVA चा स्वस्त स्मार्टफोन लाँच, मिळतील Powerful स्पेक्स

Updated on 16-Sep-2024
HIGHLIGHTS

नवा स्वस्त 5G फोन Lava Blaze 3 5G भारतात लाँच करण्यात आला आहे.

Lava ने हा 5G फोन 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच केला आहे.

Lava Blaze 3 5G फोन 18 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता खरेदीसाठी उपलब्ध होईल.

देशी स्मार्टफोन निर्माता Lava चा नवा स्वस्त 5G फोन Lava Blaze 3 5G भारतात लाँच करण्यात आला आहे. कंपनीने अलीकडेच Lava च्या या नव्या फोनच्या लाँचबद्दल घोषणा केली होती. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने हा 5G फोन 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच केला आहे. कमी किमतीत फोनमध्ये जबरदस्त स्पेक्स देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या फोनमध्ये प्रीमियम ग्लास बॅक डिझाइन मिळेल. तर, फोटोग्राफीसाठी लावा फोनमध्ये 50MP कॅमेरा आहे. जाणून घेऊयात संपूर्ण तपशील-

Also Read: लेटेस्ट बजेट स्मार्टफोन Realme Narzo 70 Turbo 5G ची भारतात पहिली Sale आज! मिळतील सुपर ऑफर्स

Lava Blaze 3 5G ची भारतीय किंमत

देशी स्मार्टफोन निर्माता कंपनीने Lava Blaze 3 5G चा नवीनतम टीझर व्हिडिओ Lava Mobiles च्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या पोस्टनुसार फोनची किंमत 9,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. उपब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन खरेदीसाठी प्रसिद्ध शॉपिंग साईट Amazon वर सूचिबद्ध करण्यात येईल. हा फोन 18 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता खरेदीसाठी उपलब्ध होईल. कंपनीने हा फोन ब्लु आणि गोल्डन अशा दोन कलर ऑप्शन्ससह सादर केला जाईल.

Lava Blaze 3 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Lava Blaze 3 5G फोनमध्ये 6.56 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, या डिस्प्लेसह 90Hz रिफ्रेश रेट मिळणार आहे. तसेच, डिस्प्लेमध्ये सेल्फीसाठी पंच-होल कटआउट आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन MediaTek Dimensity 6020 प्रोसेसरद्वारे सुसज्ज करण्यात आला आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6GB RAM + 6GB व्हर्च्युअल रॅम आहे. तर, या फोनचे स्टोरेज 128GB पर्यंत मिळणार आहे.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेटअपमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 2MP सेकंडरी कॅमेरा मिळणार आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. फोनमध्ये उपलब्ध इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ऑडिओसाठी या फोनमध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर देण्यात आले आहेत. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :