नवीनतम Moto G05 सेल अखेर भारतीय बाजारात सुरू! किंमत 7000 रुपयांपेक्षा कमी, पहा Best ऑफर्स
Motorola ने Moto G05 स्मार्टफोन गेल्या आठवड्यात भारतात लाँच केला.
आज 13 जानेवारी 2025 रोजी भारतात या फोनची पहिली विक्री सुरू झाली आहे.
हा फोन MediaTek Helio G81 Extreme प्रोसेसरने सुसज्ज आहे.
प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी Motorola ने Moto G05 स्मार्टफोन गेल्या आठवड्यात भारतात लाँच केला. त्यानंतर, आज 13 जानेवारी 2025 रोजी भारतात या फोनची पहिली विक्री सुरू झाली आहे. प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart च्या माध्यमातून तुम्ही हा फोन खरेदी करण्यास सक्षम असाल. हा फोन कंपनीचा नवीनतम बजेट स्मार्टफोन आहे. याशिवाय, हा फोन MediaTek Helio G81 Extreme प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा मिळेल. जाणून घेऊयात Moto G05 ची किंमत आणि ऑफर्स-
Moto G05 ची किंमत आणि ऑफर्स
वर सांगितल्याप्रमाणे, 13 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजतापासून Flipkart वर Moto G05 फोनची विक्री सुरू झाली आहे. या फोनमध्ये केवळ 4GB रॅम 64GB स्टोरेज पर्याय आहे. या मॉडेलची किंमत फक्त 6,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.
सेलमध्ये फोन खरेदी केल्यास Flipkart Axis बँक क्रेडिट कार्डवर 5% सूट दिली जाईल. त्यामुळे या फोनची प्रभावी किंमत कमी होईल. त्याबरोबरच, कलर ऑप्शन्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये फॉरेस्ट ग्रीन आणि प्लम रेड कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा
Moto G05 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
लेटेस्ट Moto G05 फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा HD LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे. डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी, यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, हा फोन MediaTek Helio G81 Extreme प्रोसेसरने सुसज्ज करण्यात आला आहे. वॉटर प्रोटेक्शनसाठी फोनला IP52 रेटिंग आहे. फोनमधील ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स डॉल्बी एटमॉस सपोर्टसह येतात.
फोटोग्राफीसाठी, फोन क्वाड पिक्सेल तंत्रज्ञानासह 50MP प्रायमरी कॅमेरासह येतो. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची बॅटरी 5200mAh आहे, ज्यामध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज आहे. तसेच, मायक्रो SD कार्डद्वारे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येईल.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile