Best Smartphones Under 30000: मिड बजेटमध्ये लेटेस्ट 5G स्मार्टफोन्स भारतात उपलब्ध, पहा संपूर्ण यादी 

Best Smartphones Under 30000: मिड बजेटमध्ये लेटेस्ट 5G स्मार्टफोन्स भारतात उपलब्ध, पहा संपूर्ण यादी 
HIGHLIGHTS

30,000 रुपयांच्या बजेटमध्ये उपलब्ध असलेले नवीनतम पाच सर्वोत्तम स्मार्टफोन्स

Oppo F27 Pro+ 5G फोन Amazon वर 27,999 रुपयांना सूचीबद्ध

नथिंग फोन (2a) 5G 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 21,999 रुपयांना सूचीबद्ध

Best Smartphones Under 30000: दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही स्वत:साठी किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीसाठी फोन खरेदी करण्याचा विचार करत आहात? आणि तुम्हाला माध्यम श्रेणीत म्हणेजच मिड बजेटमध्ये सर्वोत्तम स्मार्टफोन हवंय? तर अजिबात काळजी करू नका. कारण या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला 30,000 रुपयांच्या बजेटमध्ये उपलब्ध असलेले नवीनतम पाच सर्वोत्तम स्मार्टफोन्स ऑप्शन्स सांगणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात यादी-

Also Read: JioTV+ चे नवे AI Sensor फीचर लाँच! कुटुंबासोबत पाहताना ऍडल्ट सीन होणार ब्लर

Oppo F27 Pro+ 5G

Oppo F27 Pro+ 5G हा फोन कंपनीने अलीकडेच सादर केला होता. फोनचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट ई-कॉमर्स साइट Amazon वर 27,999 रुपयांना सूचीबद्ध करण्यात आला आहे. स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, 6.7-इंच 3D वक्र AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश दर, 240Hz टच सॅम्पलिंग दर, Mediatek डायमेन्सिटी 7050, 64MP प्राथमिक सेन्सर आणि 2MP डेप्थ सेन्सर आणि समोर 8MP सेन्सर मिळेल. बँक ऑफर्समध्ये तुम्हाला ICICI बँक क्रेडिट कार्डवरून 1799 रुपयांची सवलत मिळेल. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

Oppo F27 Pro+ 5G

Realme 12 Pro 5G

Realme 12 Pro 5G चा 12GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट Flipkart वर 21,999 रुपयांना सूचीबद्ध आहे. बँक ऑफर्समध्ये, फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यावर तुम्हाला 5% कॅशबॅक मिळू शकतो. Realme 12 Pro 5G फोनमध्ये 2412 x 1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.7-इंच फुलएचडी+ पंच-होल डिस्प्ले आहे. हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. पॉवर बॅकअपसाठी, Realme 12 Pro 5G फोनमध्ये 5,000 mAh बॅटरी आहे.

Motorola Edge 50 Pro 5G

Motorola Edge 50 Pro 5G चा 8GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वर 30,998 रुपयांना लिस्ट झाला आहे. बँक ऑफरच्या बाबतीत, तुम्हाला फेडरल बँक क्रेडिट कार्डसह 2,000 रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 16GB (8+8) RAM, 50MP+13MP+10MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि 50MP फ्रंट कॅमेरा मिळेल. तर, फोनला पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी IP68 रेटिंगसुद्धा मिळाली आहे. Buy From Here

Motorola-Edge-50-Pro smartphones
Motorola Edge 50 Pro

Samsung Galaxy A34 5G

Samsung Galaxy A34 5G चा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 22,990 रुपयांना सूचीबद्ध आहे. या Samsung फोनमध्ये तुम्हाला 8GB रॅम मिळेल. हा स्मार्टफोन Android 13 वर आधारित One UI 5.1 वर काम करतो. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्याची मुख्य लेन्स 48MP आहे. याशिवाय 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 5MP मॅक्रो लेन्स उपलब्ध आहेत.

Nothing Phone (2a) 5G

नथिंग फोन (2a) 5G 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 21,999 रुपयांना सूचीबद्ध आहे. बँक ऑफर पाहता, तुम्हाला SBI क्रेडिट कार्डसह 10% मिळू शकते. फोनमध्ये 6.7-इंच लांबीचा 2412×1084 पिक्सेल रिझोल्युशनसह फुल HD+ OLED फ्लेक्सी AMOLED डिस्प्ले आहे, जो 120 Hz ॲडॉप्टिव्ह रिफ्रेश रेट, 240 Hz टच सॅम्पलिंग रेट, HDR10+, 1300 nits पीक ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरिला Glass संरक्षणासह येतो. यात 50MP + 50MP चा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. समोर, कंपनीने 32MP सेल्फी कॅमेरा दिला आहे.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo