64MP Camera Smartphones under 30000: परवडणाऱ्या किमतीत मिळतील अप्रतिम कॅमेरा फीचर्स, पहा यादी
64MP कॅमेरा असलेले नवीनतम जबरदस्त स्मार्टफोन्स
OPPO F27 Pro Plus मध्ये पडल्यामुळे होणाऱ्या नुकसानीपासून वाचवण्यासाठी त्यात एक विशेष थर आहे.
Lava Blaze Duo स्मार्टफोनमध्ये ड्युअल डिस्प्ले मिळेल.
64MP Camera Smartphones under 25000: आपणा सर्वांनाच माहिती आहे की, आजकाल सगळ्यांनाच व्हिडीओ आणि फोटोशूटचे क्रेझ आहे. तुम्हालाही व्हिडिओ आणि फोटोशूटसारख्या प्रोफेशनलसाठी चांगला मोबाइल घ्यायचा असेल, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. या रिपोर्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी चांगली यादी तयार केली आहे. या सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन्सच्या यादीमध्ये तुम्हाला 64MP पर्यंतचे कॅमेरे असलेले स्मार्टफोन्स मिळत आहेत. या यादीमध्ये Lava, Oppo इ. प्रसिद्ध स्मार्टफोन्स निर्माताचे फोन्स समाविष्ट आहेत. पहा यादी-
Also Read: Best 5G Smartphones Under 9000: कमी किमतीत सर्वोत्तम स्मार्टफोन्स उपलब्ध! Lava, Redmi फोन्स समाविष्ट
Lava Blaze Duo
देशी कंपनी Lava ने Lava Blaze Duo स्मार्टफोन नुकतेच लाँच केला आहे. या फोनमध्ये 6.67-इंच लांबीचा फुल HD+ 3D कर्व AMOLED स्क्रीन मिळेल. तर, मागील पॅनेलवर 1.58-इंच लांबीची AMOLED स्क्रीन मिळेल. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7025 प्रोसेसर देण्यात आला आहे. कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास, 64MP प्राथमिक मागील कॅमेरा, 2MP सेकंडरी कॅमेरा आणि 16MP सेल्फी कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी, फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 33W जलद चार्जिंग मिळेल.
OPPO F27 Pro Plus
OPPO F27 Pro Plus स्मार्टफोनची किंमत 27,999 रुपये इतकी आहे. या फोनमध्ये 6.7-इंच लांबीचा 120Hz AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी मागील बाजूस 64MP चा प्राथमिक सेन्सर आणि 2MP चा डेप्थ सेन्सर आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 67W जलद चार्जिंगसह 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. Oppo F27 Pro+ 5G फोनला पडल्यामुळे होणाऱ्या नुकसानीपासून वाचवण्यासाठी त्यात एक विशेष थर लावला आहे.
Infinix Zero 40
Infinix Zero 40 स्मार्टफोनची किंमत 26,893 रुपये इतकी आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, Infinix Zero 40 5G फोन 6.78 इंच लांबीचा फुल HD+ रिझोल्यूशन कर्व AMOLED डिस्प्लेसह येतो. फोटोग्राफीसाठी, Infinix Zero 40 5G मधील मागील कॅमेरा सेटअप LED फ्लॅशसह प्रदान करण्यात आला आहे. ज्यामध्ये OIS तंत्रज्ञानासह 108MP प्राथमिक कॅमेरा, 50MP अल्ट्रा-वाइड आणि 2MP कॅमेरा लेन्स बसवण्यात आल्या आहेत. त्याच वेळी, सेल्फी प्रेमींसाठी विशेष 50MP अल्ट्रा-वाइड फ्रंट कॅमेरा आहे. या कॅमेऱ्यासोबत ग्राहकांना अनेक AI फीचर्सही मिळतील.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile