5G Smartphones under rs 15000: स्वस्त स्मार्टफोन खरेदी करायचंय? Affordable किमतीत लेटेस्ट Options बघा। Tech News 

5G Smartphones under rs 15000: स्वस्त स्मार्टफोन खरेदी करायचंय? Affordable किमतीत लेटेस्ट Options बघा। Tech News 
HIGHLIGHTS

बजेट रेंज अंतर्गत OPPO A59 5G स्मार्टफोन नुकताच लाँच झालेला आहे.

Redmi 12 5G फोन Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे.

Samsung Galaxy M34 5G फोन 50MP मेन कॅमेरासह येतो.

2023 हे वर्ष स्मार्टफोन जगतात अगदी कमालीचे ठरले आहे. वर्षाअखेर स्मार्टफोन निर्माता कंपन्यांनी अनेक बजेट 5G Smartphones बाजारात आणले आहेत. तुम्ही देखील लवकरच बजेटमध्ये नवीन 5G फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, तुम्हाला 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदीसाठी उपलब्ध अनेक प्रसिद्ध ब्रँड्सचे लेटेस्ट आणि बेस्ट ऑप्शन्स मिळतील. आम्ही तुम्हाला सांगतो की, यामध्ये Samsung, Oppo आणि Redmi सारख्या कंपन्यांचे फोन समाविष्ट आहेत. बघा यादी-

OPPO A59 5G

Oppo A59 5G
Oppo A59 5G

OPPO A59 5G स्मार्टफोन नुकतेच लाँच झाला असून त्याची सेल देखील सुरु झाली आहे. स्मार्टफोनच्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 14,999 रुपये आहे. फोनवर बँक कार्डद्वारे 1500 रुपयांची सूट दिली जात आहे. तसेच, तुम्ही ते 727 रुपयांच्या प्रारंभिक EMI वर घरी आणू शकता. येथून खरेदी करा

फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, Oppo A59 5G फोनमध्ये 6.56 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे. याशिवाय फोन MediaTek Dimensity 6020 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 13MP बॅक आणि 8MP फ्रंट कॅमेरा आहे. फोनची बॅटरी 5000mAh आहे, ज्यामध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.

Samsung Galaxy M34 5G

Samsung Galaxy M34 5G फोनच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 18,499 रुपये आहे. फोनवर 800 रुपयांचा प्रारंभिक EMI पर्याय देखील उपलब्ध आहे. फोनच्या स्पेक्सबद्दल थोडक्यात सांगायचे झाल्यास, या सॅमसंग फोनमध्ये 6.5 इंच लांबीचा डिस्प्ले, Exynos 1280 प्रोसेसर, 50MP कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे. Buy from here

smartphones under rs 15000

Redmi 12 5G

Redmi 12 5G फोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजची किंमत 15,499 रुपये आहे. बँक कार्डद्वारे या फोनवर 1000 रुपयांची सूट दिली जात आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Redmi फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्ले देण्यात आला आहे. तर, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या हा फोन Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा देखील आहे. तर, पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 5000mAh बॅटरी मिळेल, जी काही मूलभूत कार्यांसह दोन दिवस टिकेल. Buy from here

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo