तुम्ही स्वत:साठी स्वस्त 5G फोन शोधत असाल तर हा लेख तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. ग्राहकांची मागणी आणि गरज लक्षात घेऊन आम्ही एक यादी तयार केली आहे, ज्यामध्ये भारतीय बाजारपेठेत सर्वात स्वस्त आणि नवीन 5G फोन उपलब्ध आहेत. या सर्व मोबाईलची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी आहे, जी तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते. आम्ही तुमच्याससाठी नुकतेच लाँच करण्यात आलेल्या 5G फोन्सची यादी तयार केली आहे.
Realme 11X 5G फोन भारतात 23 ऑगस्ट रोजी लॉन्च करण्यात आला आहे. त्याच्या 6 GB RAM + 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे आणि 8 GB RAM + 128 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे. हा मोबाईल फोन MediaTek Dimensity 6100+ वर चालतो. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 64 MPचा ड्युअल रियर कॅमेरा आणि 8MP चा सेल्फी कॅमेरा आहे. स्मार्टफोन 33W SuperVOOC चार्जिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे आणि 5,000mAh बॅटरीला सपोर्ट करतो.
हा Poco फोन भारतात 5 ऑगस्ट रोजी लॉन्च करण्यात आला आहे, जो दोन मेमरी व्हेरियंटमध्ये आला आहे. 4GB RAM + 64GB स्टोरेजची किंमत 9,999 रुपये आणि 6GB RAM + 128GB स्टोरेजची किंमत 11,999 रुपये आहे. हा पोको फोन 2.2 GHz क्लॉक स्पीडसह Qualcomm Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसरवर चालतो. फोटोग्राफीसाठी 50MP + 2MP ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे.
Redmi 12 5G फोन भारतात 1 ऑगस्ट रोजी लाँच झाला आहे. हा मोबाईल 3 मेमरी व्हेरियंटमध्ये आला आहे ज्याची किंमत रु. 10,999 पासून सुरू होते. विशेष म्हणजे Redmi 12 5G हा भारतीय बाजारात येणारा पहिला स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये Qualcomm Snapdragon 4 Gen 2 चिपसेट देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.
Infinix Note 30 5G मध्ये 6.78 इंच फुल HD+ रिझोल्यूशन आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 6080 Octacore प्रोसेसर आहे. हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर 108-मेगापिक्सलचा प्राइमरी सेन्सर देण्यात आला आहे, जो AI तंत्रज्ञानावर काम करतो.
या फोनमध्ये 10 5G बँडचा सपोर्ट आहे, जो 4GB रॅम + 64GB स्टोरेजसह 12,999 रुपयांना खरेदी करता येईल. यात MediaTek Dimensity 6020 Octacore प्रोसेसर देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील पॅनलवर 50-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा दिला गेला आहे, तर फ्रंट पॅनलवर 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.