अत्यंत अल्पावधी काळात लाँच झाला कार्बन क्वांट्रो L50 HD

Updated on 20-Jan-2016
HIGHLIGHTS

कार्बन भारतात आपला नवीन स्मार्टफोन कार्बन क्वांट्रो L50 HD अगदी युद्धपातळीवर अल्पावधी काळात लाँच केला. त्याचबरोबर लाँचच्या आधी कंपनीने आपल्या ह्या स्मार्टफोनला आपल्या वेबसाइटवर कोणत्याही किंमतीशिवाय लिस्ट केले गेले होते.

कार्बनने भारतात आपला नवीन स्मार्टफोन कार्बन क्वांट्रो L50 HD लाँच केला. लाँचच्या आधी कंपनीने आपल्या ह्या स्मार्टफोनला आपल्या वेबसाइटवर कोणत्याही किंमतीशिवाय लिस्ट केले होते. मात्र आता हा स्मार्टफोन लाँच झाला आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत ७,९९० रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन आपल्याला ई-कॉमर्स वेबसाइट्स आणि रिटेल स्टोर्सच्या माध्यमातून अगदी सहजपणे मिळेल.  कार्बनने आपल्या ह्या नवीन क्वांट्रो-सीरिजमध्ये हा पहिला स्मार्टफोन लाँच केला आहे.

 

हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर चालतो, त्याचबरोबर ह्यात 5 इंचाची HD डिस्प्ले 720×1280 पिक्सेल रिझोल्युशनसह येईल. हा एक IPS डिस्प्ले आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 1.3GHz क्वाड-कोर प्रोसेसर दिला गेला आहे. ह्यात आपल्याला 2GBची रॅमसुद्धा मिळत आहे.

फोटोग्राफीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा f/2.0 अॅपर्चरसह मिळत आहे. त्याचबरोबर ह्यात फेज डिटेक्शन ऑटोफोकस (PADF), ब्लू ग्लास फिल्टर आणि LED फ्लॅशसुद्धा मिळत आहे. स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फिक्स्ड फोकस फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे, ज्याच्या माध्यमातून आपण उत्कृष्ट सेल्फी घेऊ शकता. स्मार्टफोनमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्दा मिळत आहे, ज्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो.

स्मार्टफोनमध्ये आपल्याला 2600mAh क्षमतेची बॅटरी मिळत आहे. जी कंपनीनुसार २००  तासांचा स्टँडबाय वेळ आणि ८ तासांचा 2G/3G वर टॉकटाइम देण्यास सक्षम आहे. ह्या स्मार्टफोनच्या कनेक्टिव्हिटी पर्यायाबाबत बोलायचे झाले तर, ह्यात 4G LTE नेटवर्क, ब्लूटुथ, वायफाय(ड्यूल बँड), GPS आणि मायक्रो-USB सुद्धा दिला गेला आहे.

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Connect On :