कार्बनने लाँच केले ४ नवीन स्मार्टफोन्स

कार्बनने लाँच केले ४ नवीन स्मार्टफोन्स
HIGHLIGHTS

कार्बनने भारतीय बाजारात आपले ४ नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. त्याचबरोबर कंपनीने असेही सांगितले आहे की, ती आपल्या काही लोकप्रिय स्मार्टफोन्सवर ५० टक्के डिस्काउंटसुद्धा देणार आहे.

कार्बनने भारतीय बाजारात आपले ४ स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. ह्या स्मार्टफोन्समध्ये टायटेनियम S205 प्लसचा समावेश आहे ज्याची किंमत आहे ६,७९० रुपये. त्याचबरोबर एक एंट्री लेवल स्मार्टफोन अल्फा A93 सुद्धा लाँच केला आहे, ज्याची किंमत आहे ३,४९० रुपये. तसेच अल्फा A91 आणि अल्फा 112 हे दोन स्मार्टफोन्ससुद्धा बाजारात आणले आहे, ज्याची किंमत अनुक्रमे ३,२९० आणि २,८९० रुपये इतकी आहे.  

त्याचबरोबर कंपनीने असेही सांगितले आहे की, ती आपल्या काही लोकप्रिय स्मार्टफोन्सवर ५० टक्के डिस्काउंटसुद्धा देणार आहे. ह्या स्मार्टफोन्समध्ये टायटेनियम मॅक 5, मॅक2  आणि टायटेनियम S201 यांचा समावेश असेल. हा डिस्काउंट आपल्याला कंपनीकडून दिवाळीत दिला जाणार आहे, जर तुम्ही खूप दिवसापासून कार्बनचा स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर तो घेण्याची हीच खरी योग्य वेळ आहे. कारण कार्बनचे हे आकर्षक फोन्स तुम्हाला ५० टक्क्यांपर्यंत डिस्काउंटसोबत मिळत आहेत. कार्बनने ही घोषणा प्रेस रिलीजच्या माध्यमातून केली आहे.

कार्बनच्या S205 स्मार्टफोनविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५ इंचाची HD डिस्प्ले दिली गेली आहे. जी तुम्हाला ड्रॅगन ट्रेल ग्लाससोबत मिळत आहे. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये 1.2GHz ड्युल-कोर प्रोसेसरसुद्धा दिला गेला आहे. त्याचबरोबर 2GB रॅम आणि 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे, ज्याला आपण 32GB पर्यंत वाढवू शकतो. अॅनड्रॉईड लॉलीपॉपवर चालणा-या ह्या स्मार्टफोनमध्ये आपल्याला २२००mAh ची बॅटरी मिळत आहे. त्याचबरोबर ह्यात ८ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा तोही ड्यूल फ्लॅशसोबत आणि  ३.२ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे.

तर अल्फा A93 बद्दल बोलायचे झाले तर, ह्यात ४.५ इंचाची 854×480 पिक्सेल FWVGA डिस्प्ले, 1.2GHz ड्यूल-कोर प्रोसेसर, 512MB रॅम, 8GBचे अंतर्गत स्टोरेज ज्याला आपण 32GB पर्यंत वाढवू शकतो हे सर्व ह्या स्मार्टफोनसोबत मिळत आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड ५.१ लॉलीपॉपवर चालतो. ह्याच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, ह्यात २ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ०.३ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा मिळत आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये १४००mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे.

कार्बनच्या तिस-या स्मार्टफोन A91 मध्ये ४ इंचाची 800×480 पिक्सेलची WVGA डिस्प्ले, 1GHz प्रोसेसर, 256MB रॅम, 512MBचे अंतर्गत स्टोरेज ज्याला आपण ३२जीबीपर्यंत वाढवू शकतो इत्यादी दिले गेले आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड ४.४ किटकॅट लॉलीपॉपवर चालतो. त्याचबरोबर ह्यात २ मेगापिक्सेलचा रियर आणि 0.3 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. ह्यामध्ये २०००mAh ची बॅटरी दिली गेली आहे.

सर्वात शेवटी, म्हणजे कार्बनचा चौथा स्मार्टफोन अल्फा 112 मध्ये ४ इंचाची डिस्प्ले जी आपल्याला 800×480 पिक्सेल रिझोल्युशन ऑफर करते. हा स्मार्टफोन 1Ghz प्रोसेसरसह बाजारात उतरवला आहे. ह्यात २५६एमबी रॅम आणि ५१२एमबीची अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे. त्याला आपण वाढवूसुद्धा शकता. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईढ 4.2 जेलीबिनवर चालतो., जो सध्या स्मार्टफोन्समधून गायब होत चाललाय. तसेच ह्या स्मार्टफोनमध्ये २ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 0.3 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 1300mAh ची बॅटरी मिळत आहे.

Ashvani Kumar

Ashvani Kumar

Ashvani Kumar is Tech, Politics, and Sports lover. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo