सेलफिश ऑपरेटिंग सिस्टमला बनवणारी कंपनी जोलाने बाजारात आपल्या ऑपरेटिंग सिस्टमला लोकप्रिय बनवण्याच्या उद्देशाने बाजारात एक नवीन फोन जोला C लाँच केला आहे. जोला C स्मार्टफोन सेलफिश ऑपरेटिंग सिस्टम 2.0 ने सुसज्ज आहे. जोला C स्मार्टफोनची किंमत EUR 169 ठेवण्यात आली आहे आणि हा आता केवळ फिनलँडमध्ये लाँच केला आहे.
जोला C च्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5 इंचाची HD डिस्प्ले दिली गेली आहे, ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 1280×720 पिक्सेल आहे. ह्यात स्नॅपड्रॅगन 212 क्वाड-कोर प्रोसेसर आहे. ह्यात 2GB रॅमसुद्धा देण्यात आली आहे. हा फोन 16GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवले जाऊ शकते. फोनमध्ये 2500mAh ची बॅटरी सुद्धा देण्यात आली आहे.
हेदेखील वाचा – २०,००० च्या किंमतीत येणारे आकर्षक स्मार्टफोन्स (मे २०१६)
हेदेखील वाचा – मोटोरोलाचा सर्वाधिक लोकप्रिय असलेला फोन मोटो रेजरची रिएन्ट्री
हेदेखील वाचा – ७००० रुपये किंमतीत येणा-या ह्या स्मार्टफोनमध्ये कोण आहे सरस?