जियोफोन यूजर्स आज पासून करू शकतील फेसबुक अॅप डाउनलोड

Updated on 15-Feb-2018
HIGHLIGHTS

हा अॅप सर्व जुन्या आणि नवीन जियोफोन यूजर्स डाउनलोड करू शकतात.

जियो चे म्हणणे आहे की हा फेसबुक अॅप खासकरून जियोफोन साठी बनवण्यात आला आहे आणि हा वीडियो बघण्यासाठी, नोटिफिकेशन पुश करण्यासाठी आणि अन्य सुविधाना सपोर्ट करेल. 

रिलायंस जियो ने घोषणा केली आहे की फेसबुक अॅप 14 फेब्रुवारी पासून जियोफोन वर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल. कंपनी चे म्हणणे आहे की अॅप ला KaiOS साठी एका वेब-आधारित ऑपरेटिंग सिस्टम च्या रुपात बदलण्यात आले आहे, ज्यावर फीचर फोन चालतो. हा सर्व जुन्या आणि नव्या जियोफोन यूजर्सना डाउनलोड करता येईल. 
जियो नुसार मोबाईल फोनला नवीन फेसबुक अॅप वीडियो बघण्यासाठी, बाहेरील लिंक उघडण्यासाठी आणि नोटिफिकेशन पुश करण्यासाठी मदत करेल. हा अॅप जियोफोन वर कर्सर फंक्शन सह काम करण्यास अनुकूल असेल. 
जियो चे निर्देशक आकाश अंबानी ने सांगितले, " जियोफोन जगातील सर्वात किफायतशीर स्मार्टफोन आहे, जो ट्रांसफॉर्मेशनल टेक्नोलॉजी ने बनला आहे, विशेष करून त्या भारतीयांसाठी जे फीचर फोन वरून स्मार्टफोन वर स्विच करत आहेत. जियो, जगातील सर्वात मोठा मोबाइल डाटा नेटवर्क आहे, जो प्रत्येक भारतीयला डाटा च्या मदतीने सशक्त करण्यासाठी बनला आहे. आणि जियोफोन या जियो मूवमेंट चा महत्वपूर्ण भाग आहे."

जियोफोन ला मागच्या वर्षी जुलै मध्ये लाँच करण्यात आले होते, हा फोन KaiOS वर चालतो, हा फायरफॉक्स ओएस चा एक जुना वर्जन आहे आणि सध्या हा फोन जियोटीवी, जियोम्यूजिक, आणि दुसर्‍या अॅप्सना सपोर्ट करतो. 
कंपनी ने आधीच घोषणा केली होती की ते लवकरच फीचर फोन साठी फेसबुक आणि व्हाॅटसॅप सारख्या अॅप्स चा सपोर्ट आणतील आणि आता फेसबुक या फोन वर आणण्यात आला आहे, पण हा फोन कधी व्हाॅटसॅप सपोर्टिव होईल ते सध्या तरी माहीत नाही. 

4G फीचर फोन तसा एक फ्री डिवाइस आहे, कारण यासाठी दिलेले 1500 रुपये तीन वर्षांनंतर डिवाइस परत केल्यास ग्राहकांना परत दिले जातील. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :