digit zero1 awards

Amazing! JioPhone Prima 4G भारतात लाँच, WhatsApp, YouTube सारख्या Appsना सपोर्ट करेल फिचर फोन। Tech News

Amazing! JioPhone Prima 4G भारतात लाँच, WhatsApp, YouTube सारख्या Appsना सपोर्ट करेल फिचर फोन। Tech News
HIGHLIGHTS

IMC नवीन JioPhone Prima 4G फिचर फोन लाँच

कंपनीने JioPhone Prima 4G फोन 2,599 रुपयांमध्ये लाँच केला आहे.

फोनमध्ये तुम्ही WhatsApp, Jiochat आणि Facebook सारखे सोशल मीडिया Apps देखील वापरू शकता.

रिलायन्स Jio कंपनीने इंडियन मोबाईल काँग्रेस म्हणेजच IMC दरम्यान आपला नवीन JioPhone Prima 4G सादर केला आहे. हा कंपनीचा नवीन फीचर फोन आहे, ज्यामध्ये अनेक स्मार्ट फीचर्स आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर हा फोन अधिकृतपणे लाँच केला जाईल असे कंपनीचे म्हणणे आहे. या फोनमध्ये तुम्हाला WhatsApp, YouTube आणि Google Maps सारख्या अनेक Apps चा सपोर्ट मिळेल. होय, यामध्ये अनेक महत्त्वाचे Apps देखील प्री-लोड केलेले आहेत. ज्याबद्दल आम्ही तुम्हाला पुढे सांगणारच आहोत. चला तर मग बघुयात किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.

JioPhone Prima 4G ची भारतातील किंमत आणि उपलब्धता

कंपनीने JioPhone Prima 4G फोन 2,599 रुपयांमध्ये लाँच केला आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास Jio चा हा फीचर फोन JioMart वर लिस्ट झाला आहे. हा फोन ब्लु आणि येलो या दोन कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करता येईल. या फोनवर अनेक कॅशबॅक ऑफर आणि बँक ऑफर्स उपलब्ध आहेत.

JioPhone Prima launched
Photo Credit: Reliance Jio

JioPhone Prima 4G

JioPhone Prima 4G मध्ये 2.4 इंच लांबीचा TFT डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 320×240 पिक्सेल आहे. हा फोन KaiOS वर काम करतो. तसेच, फोन ARM Cortex A53 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. ज्यामध्ये 512MB RAM आणि 128GB विस्तार करण्याइतकी स्टोरेज उपलब्ध आहे.

आता महत्त्वाच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, वर सांगितल्याप्रमाणे या फोनमध्ये Jioचे अनेक Apps प्री-लोड केलेले आहेत, ज्यात JioTV, Jio Cinema, JioSaavn, JioNews इ. सुविधा आहेत. याशिवाय, या फोनमध्ये तुम्ही WhatsApp, Jiochat आणि Facebook सारखे सोशल मीडिया Apps देखील वापरू शकता. ऑनलाइन पेमेंटसाठी JioPay App देखील प्रदान केले आहे.

त्याबरोबरच, Jio च्या या फोनमध्ये 4G कनेक्टिव्हिटी आहे. तसेच, या फोनमध्ये 23 भाषांचा सपोर्ट आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 0.3MP कॅमेरा आहे. तसेच, मनोरंजनासाठी फोनमध्ये FM रेडिओचे देखील सपोर्ट आहे. याशिवाय, यात 3.5mm ऑडिओ जॅक देखील आहे. फोनची बॅटरी 1800mAh आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo