JioPhone 5G आज सादर होण्याची शक्यता, 5G सेवेबाबतही होऊ शकते मोठी घोषणा

JioPhone 5G आज सादर होण्याची शक्यता, 5G सेवेबाबतही होऊ शकते मोठी घोषणा
HIGHLIGHTS

आज रिलायन्स JIO ची 45 वी वार्षिक बैठक

यामध्ये, JioPhone 5G आज सादर होण्याची शक्यता

या फोनची किंमत 10 हजार रुपयांच्या आत असू शकते.

Reliance Jio 5G इंटरनेट सेवेची वाट पाहणाऱ्या युजर्ससाठी एक चांगली बातमी आहे. कंपनी आज होणाऱ्या 45 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 5G रोलआउटची घोषणा करू शकते. तसेच, आजच्या कार्यक्रमात, कंपनी आपला पहिला 5G स्मार्टफोन JioPhone 5G चे देखील अनावरण करू शकते. असे सांगितले जात आहे की, जिओने हा 5G फोन गुगलसोबत विकसित केला आहे. त्याची किंमत 10 हजार रुपयांच्या आत असू शकते.

हे सुद्धा वाचा : AIRTEL : हा प्लॅन 84 दिवसांची वैधता आणि 2.5GB डेटासह येतो, मिळतील अनेक बेनिफिट्स

Jio Phone 5G चे संभावित फीचर्स 

रिपोर्ट्सनुसार, कंपनी या फोनमध्ये 6.5-इंच लांबीचा HD+ डिस्प्ले देऊ शकते. हे एक IPS पॅनेल असू शकते, जे 60Hz च्या रिफ्रेश रेटला समर्थन देईल. Jio Phone 5G 4GB रॅम आणि 32GB इंटर्नल स्टोरेजसह येऊ शकतो. प्रोसेसर म्हणून यामध्ये स्नॅपड्रॅगन 480 चिपसेट दिला जाऊ शकतो. OS बद्दल असे सांगितले जात आहे की कंपनी त्यात स्वतःचे विकसित PragatiOS देण्याची शक्यता आहे.

jiophone 5g

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील भागात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. यात 13-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरासह 2-मेगापिक्सेल कॅमेरा समाविष्ट असू शकतो. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी मिळण्याची शक्यता आहे, जी 18W चार्जिंग ऍडॉप्टरसह येईल. बॅटरी चार्जिंगसाठी कंपनी त्यात USB टाइप-C पोर्ट देऊ शकते. या फोनमध्ये गुगल प्ले सेवेसोबत इन-बिल्ट जिओ ऍप्सही दिले जाऊ शकतात, अशी माहिती मिळाली आहे.

12 ऑक्टोबरला 5G सेवा सुरू होणार आहे

दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की, भारतात 5G सेवा 12 ऑक्टोबर रोजी सुरू होईल. सुरुवातीच्या टप्प्यात कंपनी 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरू करणार आहे. यामध्ये दिल्ली, बंगळुरू, गांधीनगर, हैदराबाद, अहमदाबाद, गुरुग्राम, कोलकाता आणि लखनौ आणि आणखी काही मोठ्या शहरांचा समावेश आहे. काही काळानंतर ते देशभरात विस्तृत केले जाणार आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo