JioPhone 5G: 5G सर्व्हिसेस सुरु झाल्यापासून प्रत्येकाला वाटते की, आपल्याकडे सुद्धा एक 5G फोन असावे. पण काही जण या लेटेस्ट स्मार्टफोनच्या किमती बघूनच नवीन फोन घेण्याचा विचार सोडून देतात. पण आता काळजी करण्याची गरज नाही. प्रसिद्ध कंपनी रिलायन्स Jio स्वस्त आणि मस्त JioPhone 5G आणण्याच्या तयारीत आहे. हा फोन भारतातील सर्वात बजेट-फ्रेंडली 5G डिव्हाइस म्हणून लाँच होण्याची अपेक्षा आहे.
अलीकडेच, एका ट्विटर युजरने JioPhone 5G ची संभावित लाँच डेट आणि प्राईससह लाईव्ह इमेजेस देखील शेअर केले आहेत. बघा सविस्तर –
https://twitter.com/ArpitNahiMila/status/1671799350329217028?ref_src=twsrc%5Etfw
नव्या लीक्सवरून असे दिसून आले आहे की, JioPhone 5G दिवाळी आणि नवीन वर्षाच्या दरम्यान भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. JioPhone 5G ची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी ठेवण्यात येईल, असे म्हटले जात आहे. म्हणजेच हा भारतातील सर्वात परवडणारा 5G फोन ओळखला जाईल. लीक झालेल्या इमेजेसवर ultimate speed, unlimited experiences असे लिहलेले दिसून येते.
आम्ही तुम्हाला सांगतो की, या वर्षाच्या सुरुवातीला या फोनच्या स्पेक्सबाबत लीक्स पुढे आले होते. JioPhone 5G मध्ये 6.5-इंच लांबीचा IPS LCD HD+ डिस्प्ले असेल. डिव्हाइसमध्ये स्नॅपड्रॅगन 480 चिपसेट असण्याची शक्यता आहे, जो 4GB रॅम आणि 32GB स्टोरेजसह जोडला जाईल. फोनमध्ये 8-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आणि मागील बाजूस 13MP + 2MP असा ड्युअल-कॅमेरा सेटअप असणार आहे. तसेच फोनच्या बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास 5000mAh ची बॅटरी असेल, जी 18W चार्जिंग समर्थनासह येण्याची शक्यता आहे.