भारतातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी Reliane Jio आता डिव्हाइसेस विशेषत: फीचर फोनसाठी प्रसिद्ध होत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, भारताला 2G मुक्त बनवण्याचा कंपनीचा उद्देश आहे आणि म्हणूनच Jio 4G ला सपोर्ट करणारे फीचर फोन सादर करत आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, मागील वर्षी 2023 मध्ये कंपनीने JioBharat प्लॅटफॉर्मची घोषणा केली होती. ज्या अंतर्गत कंपनीने सांगितले की, ती OEM सह सहयोग करेल आणि 1000 रुपयांच्या रेंजमध्ये 4G क्षमता असलेले फीचर फोन लाँच करेल.
हे सुद्धा वाचा: WhatsApp Privacy Feature: आता कुणीही घेऊ शकणार तुमच्या प्रोफाइल फोटोचा स्क्रिनशॉट, येतोय Best फिचर
यापूर्वी Jio ने JioBharat B1 देखील लाँच केला होता. जो सध्या Amazon India वर फक्त 1299 रुपयांमध्ये सूचीबद्ध आहे. त्यानंतर, कंपनी JioBharat प्लॅटफॉर्म अंतर्गत आणखी एक फीचर फोन लाँच करणार असल्याची माहिती आहे. कंपनीने अधिकृतपणे या नवीन फोनच्या अस्तित्वाची पुष्टी अद्याप केली नाही. पण तो तो एका सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसला आहे. नवीन डिव्हाइस कदाचित JioBharat B2 नावाने एंट्री करेल, अशी अपेक्षा आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, JioBharat B1 ने फीचर फोन वापरकर्त्यांसाठी 4G कनेक्टिव्हिटी, UPI पेमेंट करण्याची क्षमता इ. बरेच काही स्वस्तात ऑफर केले आहे. त्यामुळे आगामी Jio Bharat B2 देखील या क्षमतांसह सज्ज असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे उपकरण भारतीय मानक ब्युरो (BIS) वर दिसले आहे. त्यामुळे हा फोन लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे.
JioBharat B1 फीचर फोन डिव्हाइसमध्ये 2.4-इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे. वापरकर्ते JioCinema, JioSaavn, JioPay आणि इतर प्लॅटफॉर्मवर सहज प्रवेश करू शकतात. या फोनमध्ये डिजिटल कॅमेरा आणि 2000mAh बॅटरी पॅक केली गेली आहे. लक्षात घ्या, हे फिचर फोन फक्त Jio नेटवर्कसाठी लॉक केलेले आहे. त्याबरोबरच, हा फोन 4G कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करेल.