रिलायन्स JIO लवकरच सॅटेलाइटद्वारे इंटरनेट सेवा देणार आहे. होय, मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील दूरसंचार कंपनी भारतात उपग्रह-आधारित गीगाबिट फायबर सेवा सुरू करण्यास सक्षम असेल. परंतु त्याबरोबरच, कंपनी अनेक नवीन पोस्टपेड प्लॅन्स ऑफर करते, ज्यामध्ये मोफत इंटरनेट आणि कॉलिंग सुविधा दिल्या जात आहेत. चला जाणून घेऊयात या प्लॅन्सबद्दल सविस्तर माहिती-
Jio च्या 996 रुपयांच्या फॅमिली प्लॅनमध्ये अनेक सुविधा मिळतात. याची खासियत म्हणजे यामध्ये तुम्ही फक्त 1 नंबरचे बिल भरता, परंतु त्यासोबत तुम्हाला 3 ऍड-ऑन सिम मिळत आहेत. जर तुम्ही एका सिमच्या बाबतीत बघितले तर तुम्हाला दरमहा फक्त 249 रुपये द्यावे लागतील. यासह तुम्हाला एकूण 115GB डेटा अनलिमिटेड कॉलिंग, 5G डेटाची सुविधा दिली जात आहे. यात Netflix आणि Amazon Prime चीही सुविधा आहे.
798 रुपयांच्या प्लॅनमध्येही तुम्हाला अनेक सुविधा मिळतात. यामध्ये तुम्हाला एकूण 2 क्रमांक वापरता येतील. या प्लॅनमध्ये तुम्हाला वापरासाठी एकूण 105GB डेटा देखील दिला जातो. म्हणजेच तुम्हाला एकूण 2 नंबरवर डेटा कॉल करण्याची सुविधा दिली जात आहे. लक्षात घ्या की, एका नंबरसाठी तुम्हाला 399 रुपये मोजावे लागतील. या प्लॅनना सर्वाधिक मागणी आहे. हा प्लॅन विशेषत: अशा वापरकर्त्यांसाठी जे कमी किंमतीत चांगले ऑफर शोधत आहेत.
Jio च्या 897 रुपयांच्या फॅमिली प्लॅनमध्ये 110GB डेटा दिला जातो. तसेच एका सिमवर महिन्याला 299 रुपये बिल भरावे लागेल. म्हणजेच यात एकूण 3 सिम कार्ड आहेत, ज्यावर तुम्ही कॉलिंग आणि डेटाचा आनंद घेऊ शकता. अशा परिस्थितीत हा तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो.