Jio कडे आपल्या ग्राहकांसाठी अनेक प्रकारचे प्रीपेड रिचार्ज प्लॅन आहेत. या प्लॅनमध्ये यूजर्सना डेली डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, SMS तसेच OTT फायदे मिळतात. बऱ्याच वापरकर्त्यांची गरज लक्षात घेऊन, Jio कंपनी आपल्या प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये दररोज 1GB डेटा, 2GB डेटा आणि 3GB डेटाचे पर्याय ऑफर करते. चला तर मग जास्त वेल न घालवता जाणून घेऊयात Jio चे डेली 3GB डेटासह येणारे प्लॅन्स.
Jio आपल्या प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये तीन प्लॅन्स ऑफर करते, जे वापरकर्त्यांना दररोज 3GB डेटाचा ऍक्सेस देतात. विशेष बाब म्हणजे या प्लॅनमध्ये रोजच्या डेटासोबत कंपनी स्वतंत्रपणे अतिरिक्त फ्री डेटाही देत आहे. चला तर मग बघुयात प्लॅन्सची किंमत आणि बेनिफिट्स-
यादीमधील पहिला स्वस्त प्लॅन 399 रुपयांचा आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवसांपर्यंत आहे. जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा उपलब्ध आहे. मात्र, रोजच्या 3GB डेटासोबत कंपनी स्वतंत्रपणे 6GB फ्री डेटा देते. याशिवाय या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 मोफत SMS देखील मिळतात. या प्लॅनसह तुम्हाला संपूर्ण दुनियेशी सहज आणि सतत कनेक्ट राहता येईल.
दररोज 3GB डेटासह यादीतील पुढील प्लॅन 999 रुपयांचा आहे. या प्लॅनची वैधता 84 दिवसांपर्यंत आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 3GB डेटा मिळतो. यासोबत कंपनी यूजर्सना 40GB अतिरिक्त फ्री डेटा देते. त्यानुसार वैधतेदरम्यान हा प्लॅन एकूण 292GB डेटासह मिळेल. प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 मोफत SMS मिळतात.
हा प्लॅन 84 दिवसांची वैधता प्रदान करतो. या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा व्यतिरिक्त 40GB मोफत अतिरिक्त डेटा देखील देते. त्यानुसार या प्लॅनमध्ये एकूण 292GB डेटा मिळणार आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएस देखील मिळतात. यासह युजर्सच्या मनोरंजनाची देखील सोया करण्यात आली आहे. प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना मोफत Netflix सबस्क्रिप्शन मिळणार आहे, ज्याची वैधता देखील 84 दिवसांपर्यंत असेल.