जियो 4G डाउनलोड स्पीड मध्ये जानेवारीत अव्वल

जियो 4G डाउनलोड स्पीड मध्ये जानेवारीत अव्वल
HIGHLIGHTS

रिलायंस जियो जानेवारी 2018 मध्ये 4जी डेटा डाउनलोड च्या सरासरी स्पीड च्या चार्ट मध्ये अव्वल ठरला आहे.

रिलायंस जियो जानेवारी 2018 मध्ये 4जी डेटा डाउनलोड च्या सरासरी स्पीड च्या चार्ट मध्ये अव्वल ठरला आहे. भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरण ने जारी केलेल्या आकड्यांवरून हे स्पष्ट झाले आहे. या यादीत वर्ष 2017 मध्ये जियो संपूर्ण वर्ष भर अव्वलस्थानी राहिली आहे. 
जियो जानेवारी 2018 मध्ये 21.3 एमबीपीएस च्या सरासरी डाउनलोड स्पीड सह यादीत अव्वलस्थानी होती, तर एयरटेल चा स्पीड 8.8 एमबीपीएस, आयडिया सेल्युलर चा 6.8 एमबीपीएस आणि वोडाफोन चा 7.2 एमबीपीएस होता. 
आता काही दिवसांपुर्वी समोर आले होते की लवकरच JioPhone वर पण व्हाट्सॅप वापरणे शक्य होईल. एका नव्या रिपोर्ट वरून समजले आहे की व्हाट्सॅप KaiOS साठी आपल्या मेसेजिंग प्लॅटफॉर्म चा वेरिएंट लॉन्च करण्याची तयारी करत आहे. पण कंपनी ने अजून पर्यंत याबाबतीत काही विधान केले नाही. KaiOS लिनक्स वर आधारित मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम आहे जी नॉन-टच डिवाइस मध्ये इंस्टाल केली जाते आणि जी चांगली बॅटरी लाइफ देते. 
रिपोर्ट नुसार, व्हाट्सॅप आपल्या अॅप चे अस वर्जन तयार करत आहे जो KaiOS वर चालेल. दावा केला जात आहे की जियोफोन यूजर्स लवकरच आपल्या डिवाइस मध्ये व्हाट्सॅप वापरू शकतील. 
पण हे काही पहिल्यांदाच ऐकायला मिळत नाही की जियोफोन ला व्हाट्सॅप सपोर्ट मिळणार आहे. याआधी पण अशी बातमी आलेली की जियोफोन साठी व्हाट्सॅप चे लाइट वर्जन जारी केले जाईल. 

जियोफोन मागच्या वर्षी जुलै 2017 मध्ये लॉन्च करण्यात आला होता. लॉन्च च्या वेळेस फीचर फोन मध्ये फेसबुक सपोर्ट नव्हता पण काही दिवसांपूर्वी जियोफोन ला फेसबुक सपोर्ट पण मिळाला आहे. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo