वनप्लस 3 स्मार्टफोनल १५ जूनला लाँच होणार आहे हे आपल्याला सर्वांना माहितच असेल. पण आता अशी बातमी मिळत आहे की, लूप VR द्वारा ह्या लाँचिंग कार्यक्रमाला जे लोक पाहतील ते सर्वात आधी ह्या स्मार्टफोनला ऑर्डर करु शकतील.
मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी वनप्लस लवकरच बाजारात आपला नवीन फोन वनप्लस 3 लाँच करणार आहे. आतापर्यंत वनप्लस च्या कोणत्याही फोनला खरेदी करण्यासाठी निमंत्रणाची गरज पडत होती. मात्र आता कंपनी आपल्या ह्या सेल मॉडलला बदलण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे कंपनी आता लवकरच लाँच होणा-या वनप्लस 3 स्मार्टफोनला कोणत्याही निमंत्रणाशिवाय खरेदीसाठी उपलब्ध करणार आहे. ह्या स्मार्टफोनला घेण्यासाठी आता कोणत्याही रजिस्ट्रेशची गरज पडणार नाही.
वनप्लसचे सहसंस्थापक कार्ल पेईने स्वत: ह्याविषयी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले आहे की, “वनप्लस 3 स्मार्टफोन आता इनवाइट फ्री असेल.”वनप्लस 3 स्मार्टफोनल १५ जूनला लाँच होणार आहे हे आपल्याला सर्वांना माहितच असेल. पण आता अशी बातमी मिळत आहे की, लूप VR द्वारा ह्या लाँचिंग कार्यक्रमाला जे लोक पाहतील ते सर्वात आधी ह्या स्मार्टफोनला ऑर्डर करु शकतील.
वनप्लस 3 स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची AMOLED डिस्प्ले दिली आहे. ह्या डिस्प्लेचे आकार 1080p असेल. त्याचबरोबर ह्यात NFC सपोर्ट मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. हा स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसरसह येईल. ह्यात 4GB रॅम आणि 6GB रॅम निवडण्याचा पर्याय असेल.