UPI सपोर्टसह JioBharat B1 नवा Affordable Feature फोन भारतात लाँच, किंमत 1300 रुपयांपेक्षा कमी। Tech News 

UPI सपोर्टसह JioBharat B1 नवा Affordable Feature फोन भारतात लाँच, किंमत 1300 रुपयांपेक्षा कमी। Tech News 
HIGHLIGHTS

कंपनीने भारतात JioBharat B1 4G फीचर फोन लाँच केला आहे.

Jio चा हा नवीन फोन केवळ 1,299 रुपयांच्या किंमतीत लाँच केला गेला आहे.

Amazon.in वरून ग्राहकांना हा फोन ऑनलाइन खरेदी करता येईल.

मुकेश अंबामी यांच्या रिलायन्स Jio कंपनीने या वर्षी जुलैमध्ये आपली परवडणारी इंटरनेट-सक्षम 4G फोन सिरीज JioBharat लाँच केली. लाँचच्या वेळी या नव्या सिरीजला ग्राहकांची भरपूर पसंती मिळाली होती. आता टेल्कोने नवीन 4G फोन लाँच करून आपल्या लोकप्रिय सिरींजचा विस्तार केला आहे. कंपनीने भारतात JioBharat B1 4G फीचर फोन लाँच केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या सिरीजमधील हा तिसरा फोन आहे. चला जाणून घेऊयात या फोनची किंमत आणि इतर फीचर्स.

JioBharat B1 ची किंमत

हा फोन अगदी प्रत्येकाच्या बजेट श्रेणीमध्ये सादर करण्यात आला आहे. Jio चा हा नवीन फोन केवळ 1,299 रुपयांच्या किंमतीत लाँच केला गेला आहे. हा फोन तुम्ही फक्त ब्लॅक कलरमध्ये खरेदी करू शकता. या फोनच्या उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, Amazon.in वरून ग्राहकांना हा फोन ऑनलाइन खरेदी करता येईल.

JioBharat B1

JioBharat B1

डिझाईनबद्दल सांगायचे झाल्यास, Jio Bharat B1 ग्लॉसी आणि मॅट फिनिश डिझाइनसह येतो. फोनच्या मागील पॅनलवर Jio चा लोगो आणि एक आयताकृती कॅमेरा मॉड्यूल दिलेला आहे. फोनच्या पुढील बाजूस 2.4-इंच लांबीचा डिस्प्ले आणि अल्फान्यूमेरिक कीपॅड मिळेल. हा 4G फोन 23 भाषांना सपोर्ट करतो, अशी माहितीही कंपनीने दिली आहे.

त्याबरोबरच, विशेष म्हणजे नवीन JioBharat फोन JioPay सपोर्टसह येतो. ज्याच्या मदतीने वापरकर्ते UPI पेमेंट करू शकतात. यात तुम्हाला एफएम रेडिओ सपोर्ट देखील मिळेल. ग्राहक या 4G डिव्हाइसवर JioCinema आणि JioSaavn ऍप्स देखील ऍक्सेस करू शकतात. फोनमध्ये 2000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo