Jio Bharat 4G Phone: टेलिकॉम विश्वातील दिग्गज कंपनी म्हणजेच रिलायन्स Jio ने आपला नवीन फीचर फोन Jio Bharat 4G भारतात लाँच केला आहे. यासोबतच दोन नवीन प्रीपेड प्लॅन्सही सादर केले गेले आहेत. हा फोन आणि रिचार्ज प्लॅन '2G-मुक्त भारत' मोहिमेअंतर्गत सादर करण्यात आले आहे, असे कंपनीचे म्हणणे आहे. जिओ भारत फोनसाठी Karbonn सह भागीदारी करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे यासोबतच जिओ भारत प्लॅटफॉर्मवरूनही पडदा उचलला गेला आहे. इतर कंपन्या परवडणारे Jio Bharat फोन बनवण्यासाठी याचा वापर करू शकतील.
Jio च्या नव्या फीचर फोनमध्ये 1.77 इंच लांबीचा QVGA TFT डिस्प्ले आहे. अर्थातच, या फोनमध्ये केवळ Jioची सिम वापरता येणार आहे. त्याबरोबरच, फोनमध्ये 1000mAh ची रिमूव्हेबल बॅटरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात Jio चे तीन मोबाइल ऍप्स प्री-इंस्टॉल केलेले आहेत. म्हणेजच Jio Cinema, JioSavan आणि JioPay ऍप फोनमध्ये आधीपासून उपलब्ध असतील.
तसेच, फोनमध्ये कॅमेरा देखील समाविष्ट करण्यात आला आहे. होय, यात 0.3MP चा कॅमेरा दिला आहे आणि 3.5mm हेडफोन जॅक देखील आहे. याव्यतिरिक्त, फोनमध्ये 128GB पर्यंतचे SD कार्ड इंस्टॉल करता येईल. Jio Bharat फोनची किंमत केवळ 999 रुपये आहे. या डिवाइसची विक्री 7 जुलैपासून सुरू होणार आहे.
या प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. तसेच, प्लॅनमध्ये दररोज 0.5GB डेटा म्हणजेच एकूण 14GB डेटा उपलब्ध असेल.
नव्या वार्षिक प्लॅनची किंमत 1,234 रुपये आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगसह दररोज 0.5GB डेटा म्हणजेच एकूण 168GB डेटा दिला जात आहे.