Jio Bharat 4G फीचर फोन गेल्या महिन्याच्या सुरुवातीला लाँच करण्यात आला होता. लॉन्च झाल्यानंतर काही दिवसांनी अधिकृत रिटेल स्टोअरमधून फोन विकला गेला. जिओ भारत फोन व्यतिरिक्त, कंपनीने दोन जिओ भारत प्लॅन देखील सादर केले आहेत. आता कंपनीने आपला नवीनतम फीचर फोन ऑनलाइन विकण्यासाठी Amazon India सोबत हातमिळवणी केली आहे, अशी माहिती मिळाली आहे. तसेच, या फोनची सेल डेटही जाहीर करण्यात आली आहे.
Jio Bharat 4G फोन या डिवाइसची विक्री Amazon India वर 28 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता सुरु होईल. या दरम्यान, इच्छुक ग्राहकांना फोन खरेदीवर आकर्षक ऑफर मिळतील. विशेष म्हणजे या फोनची किमंत केवळ 999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.
जिओ भारत फोनची डिझाईन सामान्य फीचर फोनसारखी आहे. यात T9 स्टाइल फिजिकल कीबोर्ड आहे. त्याबरोबरच, यात 1.77 इंच लांबीचा डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले स्क्रीन कंटेंट बघण्यासाठी पुरेसा आहे. याचे इंटर्नल स्टोरेज 128GB पर्यंत वाढवता येऊ शकते. याव्यतिरिक्त, डिव्हाइस LED फ्लॅश लाइटसह 0.3MP VGA कॅमेरा आहे. Jio चा हा फीचर फोन 4G LTE कनेक्टिव्हिटीसह येतो. या मोबाईलमध्ये 1000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. याशिवाय फिचर फोनमध्ये ब्राइट टॉर्च आणि रेडिओ सपोर्ट उपलब्ध आहे.
हे सुद्धा वाचा: Jio Plan Price Hike: ग्राहकांना झटका! 'या' स्वस्त आणि मस्त रिचार्ज प्लॅनसाठी द्यावे लागतील अधिक पैसे
Jio Bharat Plan ची सुरवातीची किंमत 123 रुपये आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग दिले जात असून दररोज 0.5GB डेटा मिळतो. या रिचार्ज प्लॅनची वेळ मर्यादा २८ दिवसांची आहे. याशिवाय वार्षिक रिचार्ज प्लॅन्सही या विभागात सादर करण्यात आला आहे. ज्याची किंमत 1,234 रुपये ठेवण्यात आली आहे. अर्थातच या प्लॅनची वैधता एक वर्षाची आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि 0.5GB डेटा दिला गेला आहे. वैधतेदरम्यान या प्लॅनमध्ये एकूण 168GB डेटा मिळेल.