Jio AirFiber Data Sachets: प्रसिद्ध टेलिकॉम दिग्गज Jio ने अलीकडेच फिक्स्ड वायरलेस इंटरनेट कनेक्शन सर्व्हिस Jio AirFiber किंवा 5G FWA (फिक्स्ड-वायरलेस एक्सेस) लाँच केली होती. ही सेवा वापरकर्त्यांना वायरलेस हाय-स्पीड इंटरनेट सेवा प्रदान करते. ही सर्व्हिस भारतातील अनेक ठिकाणी पोहोचली आहे. या सर्व्हिस अंतर्गत कंपनीने प्लॅन्सदेखील सादर केले आहेत. या लाईनअपमध्ये कंपनी AirFiber Data Sachets प्लॅन्स लाँच केले आहेत.
Also Read: नव्या स्टोरेज व्हेरिएंटसह Realme P1 Pro 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि सर्व डिटेल्स
Jio AirFiber Data Sachets हे एक प्रकारे डेटा व्हाउचर्स आहेत. कंपनी Jio AirFiber Data Sachets अंतर्गत 3 प्लॅन्स सादर करत आहे. नव्या प्लॅन्सच्या सुरुवातीची किंमत फक्त 101 रुपये आहे. याशिवाय, दुसरा प्लॅन 251 रुपये आणि तिसरा प्लॅन 401 रुपयांचा आहे. हे प्लॅन ऍक्टिव्ह करून युजर्स अतिरिक्त डेटाचा लाभ देऊ शकतात.
AirFiber Data Sachet च्या 101 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास, हा प्लॅ वापरकर्त्यांना 100GB अतिरिक्त डेटा प्रदान करतो. मात्र, यासाठी तुमच्याकडे ऍक्टिव्ह बेस प्लॅन असणे आवश्यक आहे.
Jio चा हा 251 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास, प्लॅन यूजर्सना 500GB डेटा ऍक्सेस देतो. या प्लॅनची वैधता देखील सक्रिय प्लॅनवर अवलंबून आहे.
Jio चा 401 रुपयांच्या AirFiber Data Sachet प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 1TB अतिरिक्त डेटा प्रदान करतो. वरील सर्व प्लॅन्सप्रमाणे, या प्लॅनची वैधता देखील ऍक्टिव्ह प्लॅनवर अवलंबून आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनी सध्या AirFiber सेवेअंतर्गत फक्त 1TB पर्यंत डेटा प्रदान करते. जरी 1TB डेटा पुरेसा असला तरी काहीवेळा इंटरनेटच्या अतिवापरामुळे 1TB डेटाही कमी वाटतो. मात्र, AirFiber ची ही कमतरता भरून काढण्यासाठी कंपनीने वरील AirFiber Data Sachets प्लॅन्स सादर केले.